Jos buttler scored century on his 100th ipl match joins the record tally with kl rahul amd2000 twitter
Sports

Jos Buttler Record: १०० व्या सामन्यात १००.. शतक झळकावताच जोस बटलरचा केएल राहुल अन् गेलसारख्या दिग्गजांच्या यादीत प्रवेश

Jos Buttler Record News: पहिल्या डावात फलंदाजी करताना विराट कोहलीने ११३ धावांची शानदार खेळी केली. त्यानंतर दुसऱ्या डावात जोस बटलरने षटकार मारत आपलं शतक पूर्ण केलं.

Ankush Dhavre

RR vs RCB, Jos Buttler Record:

आयपीएल २०२३ स्पर्धेतील १९ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा ६ गडी राखून पराभव केला आहे. हा राजस्थान रॉयल्स संघाचा या हंगामातील सलग चौथा विजय आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला ५ पैकी ४ सामने गमवावे लागले आहे. पहिल्या डावात फलंदाजी करताना विराट कोहलीने ११३ धावांची शानदार खेळी केली. त्यानंतर दुसऱ्या डावात जोस बटलरने षटकार मारत आपलं शतक पूर्ण केलं. हा त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील १०० वा सामना होता. हा सामना खास बनवत त्याने शतक साजरं केलं आहे.

केएल राहुलच्या क्लबमध्ये प्रवेश...

आपल्या १०० व्या आयपीएल सामन्यात शतक झळकावत त्याने एका खास क्लबमध्ये प्रवेश केला आहे. तो आयपीएल कारकिर्दीतील १०० व्या सामन्यात शतक झळकावणारा दुसराच फलंदाज ठरला आहे. यापूर्वी हा कारनामा केएल राहुलने करून दाखवला होता. त्याने २०२२ मध्ये लखनऊ सुपर जायंट्स संघाकडून खेळताना मुंबई इंडियन्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात नाबाद १०३ धावांची खेळी केली होती. आता या यादीत जोस बटलरनेही स्थान मिळवलं आहे. (Cricket news in marathi)

आणखी एका खास विक्रमाची नोंद...

या सामन्यात विराट कोहलीने आपल्या आयपीएल कारकिर्दीतील ८ वं शतक झळकावलं. तो आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक शतकं झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी आहे. तर ६ शतकं झळकावणारा जोस बटलर हा संयुकरित्या दुसऱ्या स्थानी आहे. या विक्रमात त्याने ख्रिस गेलच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. गेलच्या नावेही आयपीएल स्पर्धेत ६ शतकं झळकावण्याची नोंद आहे. तर केएल राहुल ,डेव्हिड वॉर्नर आणि शेन वॉटसन यांनी प्रत्येकी ४-४ शतकं झळकावली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Muharram : मोहरमच्या आनंदावर विरजण, आगीत हनुमंतचा मृत्यू; काळजात धस्स करणारी घटना

GK: टोमॅटो अन् बटाटापेक्षा स्वस्त काजू! जाणून घ्या भारतातील 'हे' अनोखे ठिकाण

Pimpri Chinchwad : हिंजवडीच्या पुरस्थितीनंतर पीएमआरडीएचे कठोर पाऊल; चार जणांवर केला गुन्हा दाखल

Thane : ५६९ जणांचा व्हॉट्सअॅप ग्रुप, मनसैनिकाची शिंदेंविरोधात आक्षेपार्ह पोस्ट, ठाण्याचा शिवसैनिक खवळला

Shweta Tiwari Life : श्वेता तिवारीने १२ व्या वर्षी केली कामाला सुरूवात, मिळायचे 'इतके' पैसे

SCROLL FOR NEXT