Jofra Archer Injury Update: मुंबई इंडियन्स हा आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहे. या संघाने ५ वेळेस स्पर्धेचे जेतेपद मिळवले आहे. मात्र आयपीएल २०२३ स्पर्धेत या संघाला तशी सुरुवात करता आली नाहीये.
पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्स संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. तर तिसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाविरुद्ध ६ गडी राखून विजय मिळवत मुंबई इंडियन्स संघाने जोरदार कमबॅक केले होते.
आता चौथ्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाला आव्हान देण्यासाठी कोलकाता नाईट रायडर्स संघ मैदानात उतरणार आहे. दरम्यान या समन्यापूर्वीच मुंबई इंडियन्स संघाची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.
जोफ्रा आर्चर हा मुंबई इंडियन्स संघाचा महत्वाचा गोलंदाज आहे. जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत वेगवान गोलंदाजी आक्रमणाची धुरा जोफ्रा आर्चरच्या हाती आहे. मात्र कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध होणाऱ्या सामन्यात जोफ्रा आर्चरच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
जोफ्रा आर्चर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाविरुद्ध खेळताना दिसून आला होता. तर दिल्ली आणि चेन्नईविरुद्ध झालेल्या सामन्यांमध्ये तो दुखापतीमुळे बाहेर झाला होता. (Latest sports updates)
आज जोफ्रा आर्चर खेळणार का?
जोफ्रा आर्चर बाबत बोलताना टीम डेव्हिडने खुलासा केला आहे. त्याने सामन्याच्या एक दिवसापूर्वी माध्यमांशी बोलताना म्हटले की, 'सध्या मेडिकल टीम त्याच्यावर लक्ष ठेवून आहे. त्यांच्यात काय चर्चा झाली मला याबाबत काही कल्पना नाही. जर तो खेळण्यासाठी तयार असेल तर तो मैदानात उतरेल. कोलकाता नाईट रायडर्स संघात काही आक्रमक फलंदाज आहेत. आम्ही जर त्यांना आउट केलं तर नक्कीच आम्ही चांगली सुरुवात करू शकतो. रिंकू सारख्या फलंदाजाविरुद्व खेळताना रणनीती बनवणं जरा कठीण आहे. आम्हाला माहितेय जर आम्ही चांगला खेळ केला तर नक्कीच आम्ही विरोधी संघावर दबाव टाकू शकतो.'
आयपीएल २०२२ स्पर्धेसाठी झालेल्या लिलावात मुंबई इंडियन्स संघाने त्याच्यावर कोट्यवधींची बोली लावत आपल्या संघात स्थान दिले होते. तो २०२२ च्या संपूर्ण हंगामातून बाहेर राहणार होता. तरीदेखील मुंबई इंडियन्स संघाने त्याच्यावर मोठी बोली लावली होती. मात्र या हंगामात देखील तो दुखापतीमुळे त्रस्त आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.