csk vr rr  saam tv
Sports

CSK VS RR IPL 2023: CSK चा पराभव अन् अंबानींची चांदी! वाचा नेमकं काय घडलं

Jio Viewership Record In CSK vs RR Match: हा सामना एका विशेष कारणामुळे खास ठरला आहे.

Ankush Dhavre

CSK VS RR IPL 2023: चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पार पडला. हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत गेला होता.

त्यामुळे शेवटपर्यंत हा सामना कोण जिंकणार हे माहित नव्हतं. शेवटी संदीप शर्माच्या अप्रतिम गोलंदाजीच्या जोरावर राजस्थान रॉयल्स संघाने या सामन्यात ३ धावांनी विजय मिळवला.

दरम्यान हा सामना एका विशेष कारणामुळे खास ठरला आहे.

या सामान्याच्या शेवटच्या षटकात चेन्नई सुपर किंग्ज संघाला विजयासाठी २१ धावांची गरज होती. त्यावेळी एमएस धोनी स्ट्राईकवर होता. एमएस धोनीने २ खणखणीत षटकार मारले. त्यावेळी जिओ सिनेमावर जवळपास २.२ कोटी प्रेक्षक हा सामना पाहत होते.

हा आयपीएल २०२३ स्पर्धेतील इतिहास आहे. कारण आतापर्यंत इतके प्रेक्षक कधीच जोडले गेले नव्हते.

यावेळी आयपीएल स्पर्धा हॉटस्टारसह जिओ सिनेमा ऍपवर देखील प्रक्षेपित केली जात आहे. मुख्य बाब म्हणजे जिओ सिनेमा ऍपवर आयपीएल स्पर्धा पाहण्यासाठी कुठलेही शुल्क आकारले जात नाहीये. केवळ ऍप डाउनलोड करून ही स्पर्धा लाईव्ह पाहता येत आहे.

त्यामुळे या ऍपचे युजर्स दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. ही संख्या येणाऱ्या काही दिवसात आणखी वाढू शकते. (Latest sports updates)

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर चेन्नई सुपर किंग्ज संघाने नाणेफेक जिकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. राजस्थान रॉयल्स संघाकडून प्रथम फलंदाजी करताना जोस बटलरने ५२ तर देवदत्त पडिक्कलने ३८ धावांचे योगदान दिले. या खेळीच्या जोरावर राजस्थान रॉयल्स संघाने प्रथम फलंदाजी करताना १७५ धावा केल्या होत्या.

या धावांचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून कॉनवेने सर्वाधिक ५० धावांची खेळी केली. तर एमएस धोनीने ३२ धावांची खेळी केली. मात्र चेन्नई सुपर किंग्ज संघाला या सामन्यात ३ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मावळात राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परिषदेसाठी पहिली उमेदवारी जाहीर

Shocking News : कबड्डी खेळताना खेळाडू मैदानात कोसळला अन् मृत्यू झाला , धक्कदायक कारण आलं समोर

Actress Opps Movement: 'आज तरी पूर्ण कपडे...'; प्रसिद्ध अभिनेत्री झाली ऊप्स मूव्हमेंटची शिकार

Side effects of earbuds use: २ वर्षे इयरबड्स वापरले, कान खराब झाले; धोका टाळण्यासाठी काय कराल?

कल्याण डोंबिवलीकरांवर पाणी कपातीचे संकट! 'या' दिवशी १२ तास पाणी येणार नाही, कारण काय?

SCROLL FOR NEXT