jemimah rodrigues saam tv
क्रीडा

WPL 2023: आधी RCBची केली धुलाई मग मैदानावरच केला भांगडा! २२ वर्षीय जेमिमाचा डान्स पाहून पडाल तिच्या प्रेमात : VIDEO

फलंदाजीत चौकार षटकार मारून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी जेमिमा आता क्षेत्ररक्षण करताना प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसून आली आहे

Ankush Dhavre

Jemima Rodrigues viral dance: दिल्ली कॅपिटल्स संघाची उपकर्णधार जेमिमा रॉड्रिग्ज ही आपल्या फलंदाजीमुळे नेहमीच चर्चेत असते. तिने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाविरुध्द झालेल्या सामन्यात १५ चेंडूंमध्ये २२ धावांची तुफानी खेळी केली.

या खेळीसह तिने आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. फलंदाजीत चौकार षटकार मारून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी जेमिमा आता क्षेत्ररक्षण करताना प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसून आली आहे. तिचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (Latest sports updates)

तर झाले असे की, जेमिमा रॉड्रिग्जने सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करत असताना सामना पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन केले आहे. तिने आपल्या डान्सने चाहत्यांची मनं जिंकली आहेत.(Jemimah rodrigues viral video)

सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत असताना ती भांगडा नृत्य करताना दिसून आली. तिचा हा डान्स व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

दिल्लीचा जोरदार विजय..

विमेन्स प्रीमियर लीग २०२३ स्पर्धेतील दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुध्द रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात दिल्ली संघाने ६० धावांनी विजय मिळवला आहे. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाची कर्णधार स्म्रीती मंधानाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्स संघाने २० षटक अखेर २ गडी बाद २३२ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना २० षटक अखेर ८ गडी बाद अवघ्या १६३ धावा करता आल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT