IND VS AUS Test Series: हे २ खेळाडू संघात कायम राहिले तर टीम इंडियाचा पराभव निश्चित; अंतिम सामन्यात रोहित दाखवणार बाहेरचा रस्ता

या सामन्यात रोहित शर्मा काही महत्वाचे बदल करू शकतो.
ind vs aus
ind vs ausSaam TV

IND VS AUS 4th Test: भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ४ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिल्या २ सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला होता. यासह २-० ची आघाडी देखील घेतली होती.

मात्र इंदूर कसोटीत भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. हा सामना जिंकून ऑस्ट्रेलिया संघाने मालिकेत २-१ ने जोरदार कमबॅक केले आहे. त्यामुळे चौथा कसोटी सामना हा भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. या सामन्यात रोहित शर्मा काही महत्वाचे बदल करू शकतो. (Latest sports updates)

ind vs aus
IND VS AUS indore test: 'भारताने मुद्दाम खराब खेळपट्टी बनवली..' ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूची जहरी टीका

इंदूरच्या मैदानावर पार पडलेल्या सामन्यात भारतीय संघातील फलंदाजांना हवी तशी कामगिरी करता आली नाही. या सामन्यात केवळ चेतेश्वर पुजाराने धावा केल्या . तर इतर कुठल्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही.

दरम्यान केएस भरतला वारंवार संधी मिळूनही तो संधीचं सोनं करू शकला नाहीये. त्यामुळे चौथ्या कसोटी सामन्यात त्याचा पत्ता कट होऊ शकतो.

या मालिकेत त्याला पदार्पण करण्याची संधी देण्यात आली आहे. मात्र तो या संधीचा फायदा घेऊ शकला नाहीये. आतापर्यंत त्याने केवळ ८,६,२३,१७ आणि ३ धावांची खेळी केली आहे. त्याची ही निराशाजनक कामगिरी पाहता आगामी सामन्यात ईशान किशनला संधी दिली जाऊ शकते.

ind vs aus
IND VS AUS 3rd Test: 'आपण जडेजामुळे हरलो..' सुनील गावसकरांनी जडेजावर फोडलं पराभवाचं खापर

केवळ केएस भरत नव्हे तर श्रेयस अय्यर देखील या मालिकेत चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरला आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात पुनरागमन करणाऱ्या श्रेयसला अजूनपर्यंत फॉर्म गवसला नाहीये. नागपूर कसोटीत सूर्यकुमार यादवला संधी दिली गेली होती.

मात्र श्रेयस अय्यरचे पुनरागमन झाल्यानंतर सूर्यकुमार यादवला संघाबाहेर करून श्रेयस अय्यरला संधी दिली गेली होती. मात्र तो संधीचा फायदा घेऊ शकला नाहीये. त्यामुळे अंतिम कसोटी सामन्यात श्रेयस अय्यर ऐवजी सूर्यकुमार यादवला संधी दिली जाऊ शकते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com