IND VS AUS indore test: 'भारताने मुद्दाम खराब खेळपट्टी बनवली..' ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूची जहरी टीका

इंदूर कसोटीनंतर ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधाराने खेळपट्टीवर जोरदार टीका केली आहे.
Indore pitch
Indore pitchSaam tv

IND VS AUS 3rd test mark taylor: बॉर्डर गावसकर ट्रॉफीत आतापर्यंत एकूण ३ सामने पार पडले आहे. या ३ सामन्यांपैकी २ सामन्यांमध्ये भारतीय संघाने विजय मिळवला आहे. तर तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने जोरदार कमबॅक करत ९ गडी राखून विजय मिळवला होता.

या मालिकेत भारतीय संघ २-१ ने आघाडीवर आहे. दरम्यान इंदूर कसोटीनंतर ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधाराने खेळपट्टीवर जोरदार टीका केली आहे.

ऑस्ट्रेलिया संघ भारत दौऱ्यावर येणार आणि खेळपट्टीवरून वाद होणार नाही असं होऊच शकत नाही. यापूर्वी देखील अनेकदा ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूंनी भारतीय खेळपट्टीवर टीका केल्याचे पाहायला मिळाले आहे.

मात्र यावेळी आयसीसीने दिल्लीच्या खेळपट्टीला सरासरीपेक्षा कमी रेटिंग आणि इंदूरच्या खेळपट्टीला खराब खेळपट्टी म्हटले आहे. (Latest sports updates)

Indore pitch
IND VS AUS 3rd test :इंदूरची खेळपट्टी खराब म्हणणाऱ्या आयसीसीवर सुनील गावसकर भडकले! गाबाच्या खेळपट्टीवरून सुनावले खडेबोल

याबाबत बोलताना ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मार्क टेलरने म्हटले की, 'मी सहमत आहे. मी सहमत आहे की या मालिकेसाठी तयार करण्यात आलेली खेळपट्टी खराब दर्जाची होती. खरं सांगू तर इंदोरची खेळपट्टी ही जरा जास्तच खराब होती.

सामन्याच्या पहिल्या दिवसापासून फिरकी गोलंदाजांना इतकी मदत मिळावी असे मला मुळीच वाटत नाही.'

' सामन्याच्या चौथ्या किंवा पाचव्या दिवशी चेंडू इतका फिरला की समजू शकतो. मात्र पहिल्या दिवापासून चेंडू इतका फिरत असेल तर नक्कीच खेळपट्टीत दोष आहे. माझ्या मते इंदोरची खेळपट्टी खराब आहे. त्या अनुषंगानेच रेटिंग दिली गेली आहे.

Indore pitch
IND VS AUS 3rd Test: 'आपण जडेजामुळे हरलो..' सुनील गावसकरांनी जडेजावर फोडलं पराभवाचं खापर

चौथा कसोटी सामना भारतीय संघासाठी ठरेल निर्णायक..

भारतीय संघाला जर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश करायचा असेल, तर कुठल्याही परिस्थितीत चौथा कसोटी सामना जिंकावा लागणार आहे.

हा सामना गमावल्यास भारतीय संघाचा अंतिम फेरीत जाण्याच मार्ग आणखी कठीण होऊ शकतो. मालिकेतील अंतिम सामना ९ मार्चपासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com