jay shah yandex
Sports

Jay Shah: जय शहांची पॉवर आणखी वाढणार! BCCI नंतर ICCचं मोठं पद मिळण्याची शक्यता

Jay Shah ICC Chairman: बीसीसीआयचे सचिव जय शहा यांची २०१९ मध्ये बीसीसीआयच्या सचिवपदी निवड करण्यात आली होती.

Ankush Dhavre

जय शहा हे २०१९ पासून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( बीसीसीआयच्या) सचिवपदी विराजमान आहेत. मात्र आता अशी चर्चा सुरू आहे की, ते आयसीसीच्या चेअरमन पदासाठी अर्ज दाखल करून बिनविरोध निवडून येऊ शकतात. सध्या न्यूझीलंडचे ग्रेग बार्कले हे आयसीसीचे चेअरमन आहेत. ते दुसऱ्यांदा या पदासाठी अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.

क्रिकबजने दिलेला वृत्तानुसार येत्या जुलै महिन्यात कोलंबोत आयसीसीची एक बैठक होणार आहे. ज्यात या पदासाठी घेतल्या जाणाऱ्या निवडणुकीची तारीख ठरवण्यात येईल. माध्यमातील वृत्तानुसार जय शहा यांना आयसीसीची काम करण्याची पद्धत आवडलेली नाही. तसेच टी -२० वर्ल्डकप स्पर्धा अमेरिका आणि वेस्टइंडिजमध्ये आयोजित करण्यावरूनही ते नाराज असल्याचे सांगितले जात आहे. जर जय शहा यांनी या पदासाठी अर्ज दाखल केला आणि निवडून आले तर ते आयसीसीचे सर्वात युवा चेअरमन म्हणून ओळखले जातील.

आयसीसीच्या चेअरमन पदासाठीच्या कार्यकाळात बदल करण्यात आला आहे. यापूर्वी कुठलाही व्यक्ती ३ वेळेस चेअरमन होऊ शकत होता. या पदाचा कार्यकाळ हा २ वर्षांचा होता. मात्र आता नव्या नियमानुसार कुठलाही व्यक्ती दोन वेळेस आयसीसीचा चेअरमन होऊ शकतो. त्याचा कार्यकाळ हा ३ वर्षांचा असेल.

जय शहा यांनी २००९ मध्ये क्रिकेट ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये एंट्री केली होती. सुरुवातीला ते गुजरात क्रिकेट असोसिएशनच्या संयुक्त सचिवपदी विराजमान होते. त्यानंतर २०१५ मध्ये त्यांनी बीसीसीआयमध्ये एंट्री केली आणि २०१९ मध्ये त्यांची बीसीसीआय सचिव म्हणून नेमणूक करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

Maharashtra Politics: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

Maharashtra Live News Update: वाल्मीक कराडची पोलखोल करणाऱ्या विजयसिंह बांगर यांनी घेतली अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट

Auto Rickshaw Bag : बाजारात आलीये नवीन ऑटो रिक्षा बॅग, फॅशनचा नवा ट्रेंड

Somnath Suryawanshi: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाला नवं वळण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश|VIDEO

SCROLL FOR NEXT