jay shah yandex
क्रीडा

ICC New Chairman: मोठी बातमी! जय शहा यांची ICC च्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड, जागतिक क्रिकेटमध्ये भारताचा दबदबा

Satish Kengar

एक मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव जय शहा यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. ग्रेग बार्कले यांच्यानंतर जय शहा हे पद सांभाळणार आहेत. आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी अर्ज करणारे जय शहा हे एकमेव अर्जदार होते. यातच निवडणूक न होता जय शहा यांची बिनविरोध निवड झाली आहे.

आयसीसीचे विद्यमान अध्यक्ष ग्रेग बार्कले यांचा कार्यकाळ 30 नोव्हेंबर रोजी संपत आहे. त्यांनी सलग दुसऱ्यांदा हे पद भूषवले आहे. मात्र यंदा त्यांनी स्वतःला या शर्यतीपासून दूर केलं आहे. अशातच जय शहा यांची आज आयसीसीच्या अध्यक्षपदाची निवड झाली आहे.

आयसीसी अध्यक्ष प्रत्येकी दोन वर्षांच्या तीन टर्मसाठी पात्र असतो. न्यूझीलंडचे वकील ग्रेग बार्कले यांनी आतापर्यंत 4 वर्षे पूर्ण केली आहेत. बार्कले यांची नोव्हेंबर 2020 मध्ये आयसीसीचे स्वतंत्र अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. 2022 मध्ये त्यांची या पदावर पुन्हा निवड झाली होती.

आयसीसी अध्यक्षांसाठी हे आहेत नियम

आयसीसीच्या नियमांनुसार, अध्यक्षपदाच्या निवडणुकीत 16 मते असतात. विजय मिळवण्यासाठी उमेदवाराला 9 मतांची आवश्यकता असते. याआधी अध्यक्ष होण्यासाठी विद्यमान उमेदवाराला दोन तृतीयांश बहुमत मिळवणं आवश्यक होतं.

आयसीसीने नुकतेच सांगितले होते की, 'विद्यमान संचालकांना आता 27 ऑगस्ट 2024 पर्यंत पुढील अध्यक्षांसाठी अर्ज सादर करावे लागतील आणि जर एकापेक्षा जास्त उमेदवार असतील तर निवडणूक होईल आणि नवीन अध्यक्षांचा कार्यकाळ 1 डिसेंबरपासून सुरू होईल.'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

Friday Horoscope: शुक्रवारी या 5 राशींचे नशीब फळफळणार, देवी लक्ष्मीची होणार कृपा; वाचा राशिभविष्य

Maharashtra News Live Updates: राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! बँकेच्या कर्मचाऱ्यांना आजीवन मिळणार १०००० रुपये पेन्शन

SCROLL FOR NEXT