भारतीय क्रिकेटकडून कधीकाही सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांच्याकडून प्रचंड अपेक्षा होत्या. अशाच अपेक्षा आता जसप्रीत बुमराहकडून केल्या जातात. आशिया कप ही कदाचित पहिलाच स्पर्धा असेल ज्याची बुमराहची कामगिरी फारशी चांगली दिसलेली नाही. त्याची गोलंदाजी महागात पडतेय, तो मैदानावर थोडा चिडलेला असतो इतकंच नाही तर सोशल मीडियावरही तो चर्चेत आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरील हास्यही दिसेनासं झालं आहे.
या आशिया कपमध्ये बुमराहने चार सामन्यांत एकूण पाच विकेट्स घेतले आहेत. त्याचा इकॉनॉमी रेट ७.३३ आहे. आपण हे आकडे पाहिले तर ते वाईट नाही पण त्यांनी प्रतिस्पर्ध्यांमध्ये भीती निर्माण केली असं मात्र दिसलं नाही. यामध्ये अपवाद ठरला तो म्हणजे बांगलादेशविरुद्धचा सामना.
टीमचे गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्नी मॉर्केल यांनी सांगितलं, “पॉवरप्लेमध्ये तीन ओव्हर टाकणं ही फारच कठीण जबाबदारी आहे. बुमराह हा जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे. नवीन चेंडूने विकेट घेणं हीच आमची योजना आहे. सुरुवातीला जर प्रतिस्पर्ध्यांना सहा-सात विकेट्समध्ये काढत्या आलं, तर शेवटच्या ओव्हर्स सोप्या होतात. त्यामुळेच आम्ही त्याला सुरुवातीला गोलंदाजीची संधी देतो.”
मॉर्केल यांनी पुढे स्पष्ट केलं की, पिच आणि सामन्याच्या परिस्थितीनुसार ही भूमिका बदलू शकते, पण सध्या टीमला वाटतं की बुमराहकडे या कामासाठी लागणारी कौशल्यं आणि अनुभव आहे.
भारताचे सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोशेट यांनीही बुमराहच्या मेहनतीचं कौतुक केलं. त्यांनी सांगितलं, “तुम्ही टी-२० क्रिकेटमध्ये फार कमी गोलंदाजांना पॉवरप्लेमध्ये सर्व तीन ओव्हर टाकताना पाहाल. हे खूप कठीण काम आहे. पण वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी टेस्ट सिरीजच्या तयारीसाठी आणि या स्पर्धेच्या महत्त्वामुळे आम्ही त्याला ही भूमिका दिली आहे.”
बुमराहचा एकच सामना अपेक्षेप्रमाणे गेला नाही. हा सामना म्हणजे पाकिस्तानविरुद्ध सुपर फोरमधला सामना. या सामन्यात त्याने एकही विकेट घेतली नाही आणि ४५ रन्स दिल्या. टेन डोशेट म्हणाले, “तो त्याचा सर्वोत्कृष्ट दिवस नव्हता. पण त्याने जी जबाबदारी घेतली आहे, ती खूप कठीण आहे. पहिले तीन ओव्हर्स फक्त दोन फिल्डर बाहेर ठेवून टाकणं आणि शेवटची किंवा शेवटून दुसरी ओव्हर टाकणं जेव्हा फलंदाज पूर्ण ताकदीने खेळतात. काही दिवस असे येतात की, विकेट्स मिळत नाहीत आणि रन्स होतात, पण सध्या टीमच्या सेटअपमध्ये ही भूमिका सर्वात योग्य आहे.”
जसप्रीत बुमराह सामान्य मार्ग न निवडता स्वतःचा वेगळा रस्ता निवडणारा गोलंदाज आहे. माजी स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग कोच सोहम देसाई यांनी त्याच्याबद्दल सांगितलं, “बुमराह हा एक जनरेशनल टॅलेंट आहे. त्याचं शरीर, त्याची गोलंदाजी, त्याचा दृष्टिकोन आणि अल्पावधीत त्याने देशासाठी केलेलं योगदान या सगळ्यामुळे तो पुढची अनेक वर्ष चर्चेत राहणार आहे.”
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.