Jasprit Bumrah x
Sports

Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराह दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळणार? समोर आली मोठी माहिती

Ind Vs Eng 2nd Test : भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्याला २ जुलै रोजी सुरुवात होणार आहे. या सामन्यामध्ये जसप्रीत बुमराह खेळणार की नाही हा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

Yash Shirke

India Vs England कसोटी मालिकेतील दुसरा सामना २ जुलैपासून एजबॅस्टन येथे सुरु होणार आहे. पहिल्या सामन्यामध्ये पराभव झाल्यानंतर आता दुसरा सामना जिंकण्यासाठी भारताचा संघ सज्ज झाला आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाचे पहिले प्रशिक्षण सत्र २७ जून रोजी झाले होते. यामध्ये जसप्रीत बुमराह मैदानात उपस्थित असताना सराव करत नव्हाता. त्यामुळे बुमराह दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळणार नाही अशा चर्चा सुरु झाल्या. पण टीम इंडियाकडून याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली नाही.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, २८ जून रोजी (आज) टीम इंडियाचा पर्यायी सराव दिवस होता. सराव सत्रामध्ये संघातील काही सदस्य मैदानावर उपस्थित होते. तर शुभमन गिल व्यतिरिक्त रिषभ पंत, केएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल सराव सत्रामध्ये सहभागी झाले नव्हते. कसोटी पदार्पणात साई सुदर्शनला फारशी चांगली कामगिरी करता आली नव्हती. तो देखील नेट्समध्ये सराव करत असताना दिसला.

सरावसत्राच्या पहिल्या दिवशी जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा आणि मोहम्मद सिराज यांनी गोलंदाजीचा सराव केला नव्हता. तिघेही क्षेत्ररक्षणाचा सराव करताना दिसले, तर मोहम्मद सिराजने फलंदाजीचा सराव केला. पण आज (२८ जून) जसप्रीत बुमराहसह प्रसिद्ध कृष्णा आणि मोहम्मद सिराज गोलंदाजी करताना दिसले. बुमराह आणि सिराज यांनी आज फलंदाजीचा देखील सराव केला.

भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिका सुरु होण्यापूर्वी जसप्रीत बुमराहने 'मी फक्त दोन ते तीन सामने' खेळणार असल्याचे जाहीर केले होते. त्याने लीड्सवर पहिला सामना खेळला. तिसरा सामना लॉर्ड्सवर खेळला जाणार आहे. लॉर्ड्सवर वेगवान गोलंदाजांना फायदा होणार असल्याने बुमराह दुसऱ्या सामन्यामध्ये विश्रांती घेईल आणि लॉर्ड्सवर तिसरा सामना खेळेल असे म्हटले जात होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain: राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे, कोकणासह घाटमाथ्यावर तुफान पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Maharashtra Live News Update: पोलादपूर -महाबळेश्वरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात दरड कोसळली

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

Mumbai Police: मुंबई पोलिसांना सलाम! महिलेचा समुद्रात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसाने जिवाची पर्वा न करता वाचवलं प्राण

SCROLL FOR NEXT