jasprit bumrah saam tv news
Sports

Jasprit Bumrah,Ind vs Eng 4th Test: टीम इंडियाला मोठा धक्का! चौथ्या कसोटीतून जसप्रीत बुमराह होऊ शकतो बाहेर; वाचा कारण

Jasprit Bumrah Latest News: चौथा कसोटी सामना येत्या २३ फेब्रुवारीपासून रांचीच्या मैदानावर रंगणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी भारतीय संघाचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर येत आहे.

Ankush Dhavre

Jasprit Bumrah Ruled Out, IND vs ENG Test Series:

राजकोटच्या मैदानावर भारतीय संघाने ४३४ धावांनी शानदार विजय मिळवला आहे. या विजयासह भारतीय संघाने ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-१ ने आघाडी घेतली आहे. मालिकेतील चौथा कसोटी सामना येत्या २३ फेब्रुवारीपासून रांचीच्या मैदानावर रंगणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी भारतीय संघाचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर येत आहे.

रांची कसोटीत भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला विश्रांती दिली जाऊ शकते. क्रिकबजच्या वृत्तानुसार, भारतीय संघातील खेळाडू मंगळवारी ( २० फेब्रुवारी) राजकोटवरून रांचीसाठी रवाना होणार आहेत. मात्र जसप्रीत बुमराह भारतीय संघासह रांचीला जाणार नाही. बुमराह राजकोटवरून अहमदाबादला रवाना होणार आहे.

बुमराहला विश्रांती देण्याचं कारण काय?

जसप्रीत बुमराहने सुरुवातीच्या तिन्ही कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. या तिन्ही कसोटी सामन्यांमध्ये त्याने भारतीय संघासाठी मोलाची भूमिका बजावली आहे. दरम्यान वर्कलोड मॅनेजमेंटचा भाग म्हणून त्याला चौथ्या कसोटी सामन्यातून विश्रांती दिली जाऊ शकते. जसप्रीत बुमराहने मालिकेतील सुरुवातीच्या तिन्ही सामन्यांमध्ये ८०.५ षटक गोलंदाजी केली आहे. यादरम्यान त्याने सर्वाधिक १७ गडी बाद केले आहेत. (Cricket news in marathi)

कोणाला मिळणार संधी?

रांची कसोटीनंतर मालिकेतील अंतिम कसोटी सामना धर्मशाळाच्या मैदानावर रंगणार आहे. अंतिम कसोटीत बुमराह खेळणार की नाही, हे चौथ्या सामन्याच्या निकालावर अवलंबून असेल. चौथ्या कसोटीत मोहम्मद सिराज मुख्य गोलंदाजाच्या भूमिकेत असेल. तर मुकेश कुमारला बुमराहच्या जागी संधी दिली जाऊ शकते.

उर्वरित ३ कसोटी सामन्यांसाठी असा आहे भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, केएल राहुल*, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), आर अश्विन, रवींद्र जडेजा*, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद. सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : जय गुजरात; एकनाथ शिंदेंची पुण्यात अमित शहांसमोरच घोषणा

Govindwadi Bypass Bridge : ६ वर्षांतच पुलाची दैना; कल्याणच्या गोविंदवाडी बायपास पुलाच्या कोट्यवधींच्या कामावर प्रश्नचिन्ह

Monsoon Hair Care: पावसाळ्यात केस गळण्याची समस्या? 'या' टिप्सने घ्या केसांची योग्य काळजी

मराठमोळ्या ठसक्यात तरुणीचा जोरदार डान्स; 'चाळ माझ्या पायांत' गाण्यावर दिला धमाकेदार परफॉर्मन्स

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

SCROLL FOR NEXT