jasprit bumrah saam tv news
Sports

BCCI Awards: जसप्रीत बुमराहने रचला इतिहास! हा मानाचा पुरस्कार जिंकणारा ठरला पहिलाच गोलंदाज

Jasprit Bumrah: २०२१-२२ वर्षासाठी बुमराहची आंतरराष्ट्रीय क्रिकेटर ऑफ द इयर म्हणून निवड करण्यात आली आहे. यासह त्याच्या नावे एका मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे.

Ankush Dhavre

Jasprit Bumrah Record:

बीसीसीआयच्या अवॉर्ड शोमध्ये भारतीय खेळाडूंचं जलवा पाहायला मिळाला. या अवॉर्ड शोमध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडूंसह देशांतर्गत क्रिकेट गाजवणाऱ्या खेळाडूंचाही सन्मान करण्यात आला. यावर्षी जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीची जादू पाहायला मिळाली. मैदानात त्याने एकापेक्षा एक मोठे रेकॉर्डस् केले आहेत. दरम्यान बीसीसीआयच्या अवॉर्ड शोमध्ये त्याच्या नावे एका मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे.

बीसीसीआयने हा अवॉर्ड शो आयोजित करण्याची दुसरीच वेळ आहे. यापूर्वी २०१९ मध्ये पहिल्यांदाच या अवॉर्ड शोचे आयोजन केले गेले होते. या अवॉर्ड शोमध्ये २०१८-१९ मध्ये केलेल्या दमदार कामगिरीच्या बळावर जसप्रीत बुमराहची आंतरराष्ट्रीय क्रिकेटर ऑफ द इयर म्हणून निवड केली गेली होती.

आता २०२१-२२ वर्षासाठी त्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटर ऑफ द इयर म्हणून निवड करण्यात आली आहे. यासह या पुरस्कारावर दोन वेळेस नाव कोरणारा तो पहिलाच वेगवान गोलंदाज ठरला आहे. (Latest sports updates)

बीसीसीआयचा क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार जिंकणारे खेळाडू..

२००६-०७: सचिन तेंडुलकर

२००७-०८: विरेंद्र सेहवाग

२००८-०९: गौतम गंभीर

२००९-१०: सचिन तेंडुलकर

२०१०-११: राहुल द्रविड़

२०११-१२: विराट कोहली

२०१२-१३- आर अश्विन

२०१३-१४ - भूवनेश्वर कुमार

२०१४-१५- विराट कोहली

२०१५-१६: विराट कोहली

२०१६-१७: विराट कोहली

२०१७-१८: विराट कोहली

२०१८-१९: जसप्रीत बुमराह

२०१९-२०: मोहम्मद शमी

२०२०-२१: आर अश्विन

२०२१-२२: जसप्रीत बुमराह

२०२२-२३: शुभमन गिल

जसप्रीत बुमराहच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर त्याने ३२ कसोटी सामन्यांमध्ये १४० गडी बाद केले आहेत. तर ६२ टी -२० सामन्यांमध्ये त्याने ७४ गडी बाद केले आहेत.तर ८९ वनडे सामन्यांमध्ये त्याच्या नावे १४९ गडी बाद करण्याची नोंद आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai: प्लॅटफॉर्मवर बसून पाहत होता पॉर्न व्हिडीओ, महिलेने तरुणाला धडा शिकवला; पाहा VIDEO

Maharashtra Live News Update : रोहित पवारांना नाशिकच्या न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

Vrindavan : वृंदावनला जाताय? मग या ७ ठिकाणी नक्कीच भेट द्या

Indian Railway: वंदे भारतच्या २४ फेऱ्या महाराष्ट्रातून, सर्वाधिक जाळं पुण्यात, वाचा कोणती Vande Bharat कुठून धावते?

Pooja-Soham Bandekar Wedding : बांदेकरांची सून अन् लेकाचे लग्नातील Unseen फोटोज, पाहा पूजा-सोहमची केमिस्ट्री

SCROLL FOR NEXT