team india yandex
क्रीडा

IND vs BAN मालिकेत हा स्टार खेळाडू ठरु शकतो 'मॅचविनर', बांगलादेशचं टेन्शन वाढणार

Ankush Dhavre

टी -२० आणि वनडेनंतर आता भारताच्या कसोटी हंगामाला सुरुवात होणार आहे. या हंगामाची सुरुवात बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेने होणार आहे. २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना १९ सप्टेंबरपासून चेन्नईच्या मैदानावर रंगणार आहे.

बांगलादेशचा संघ नुकताच पाकिस्तानला २ कसोटी सामन्यांच्या मालिकेत पराभूत करून आला आहे. त्यामुळे बांगलादेशचा आत्मविश्वास वाढला आहे. दरम्यान भारतीय संघातील एक असा खेळाडू आहे, जो बांगलादेशवर एकटा भारी पडू शकतो.

राहुल द्रविड यांचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर गौतम गंभीरची मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली खेळताना भारतीय संघाने टी -२० मालिका जिंकली तर वनडे मलिका गमावली आहे. आता पहिल्यांदाच भारतीय संघ कसोटी मालिका खेळण्यासाठी उतरणार आहे.

दरम्यान गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघ कसा खेळ करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानला पराभूत करून आलेला बांगलादेशचा संघ आत्मविश्वासाने परिपूर्ण आहे.

भारतीय संघातील मॅचविनर खेळाडू

भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह भारतीय संघासाठी पुन्हा एकदा महत्वाची भूमिका बजावू शकतो. जेव्हा जेव्हा भारतीय संघ अडचणीत असतो, त्यावेळी जसप्रीत बुमराह गोलंदाजीला येऊन सामना एकहाती भारताच्या दिशेने वळवतो. यापूर्वीही अनेकदा त्याने अशी कामगिरी करुन दाखवली आहे. यावेळीही बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या मालिकेत तो चांगली कामगिरी करु शकतो.

हा कसोटी सामना चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडीयमवर होणार आहे. हे भारताचा स्टार गोलंदाज आर अश्विनचं होम ग्राऊंड आहे. या मैदानाव खेळताना त्याचा रेकॉर्ड दमदार राहिला आहे. त्याने याच मैदानावर खेळताना, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंडच्या फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवलं आहे. आता आर अश्विन बांगलादेशसाठी डोकेदुखी ठरु शकतो.

या मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी असा आहे भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, रिषभ पंत (यष्टिरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टिरक्षक), आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह आणि यश दयाल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

Employees Provident Fund: PF खातेधारकांसाठी मोठी बातमी; पीएफमधून काढता येणार १ लाख रुपये

Solapur News: धर्मराज काडादी यांनी विधानसभा लढवण्याची केली घोषणा, सोलापूरमधून उमेदवारीसाठी शिंदेंना घातलं साकडं?

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT