james anderson twitter
क्रीडा

James Anderson: आपल्या क्रिकेट कारकिर्दीत जेम्स अँडरसन या भारतीय फलंदाजाला घाबरायचा! स्वतः केला खुलासा

James Anderson On Sachin Tendulkar: इंग्लंडचा दिग्गज खेळाडू जेम्स अँडरसन आपला शेवटचा सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरला आहे.

Ankush Dhavre

गेल्या २१ वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली छाप सोडणारा जेम्स अँडरसन आपला शेवटचा सामना खेळतोय. त्याने याआधीच निवृत्तीची घोषणा केली होती. ज्या मैदानावर त्याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती, त्याच मैदानावर तो आपला शेवटचा सामना खेळतोय. दरम्यान ५०० पेक्षा अधिक गडी बाद करणाऱ्या या गोलंदाजाने आपल्या कारकिर्दीतील कुठल्या फलंदाजाला घाबरायचा याबाबत खुलासा केला आहे.

कोणत्या फलंदाजाला घाबरायचा?

जेम्स अँडरसनने आपल्या कसोटी कारकिर्दीत आतापर्यंत एकूण १८८ कसोटी सामने खेळले आहेत. दरम्यान लॉर्ड्सच्या मैदानावर तो आपला शेवटचा सामना खेळतोय. हा त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचा सामना असणार आहे. जेम्स अँडरसनने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला ९ वेळेस बाद केलं. मात्र तो सचिनविरूद्ध गोलंदाजी करण्यासाठी योजना बनवू शकला नाही. सामन्यानंतर त्याला प्रश्न विचारण्यात आला होता की, गोलंदाजी करण्यासाठी सर्वात आव्हानात्मक फलंदाज कोण? त्यावेळी त्याने सचिन तेंडुलकरचं नाव घेतलं. तो म्हणाला की, ' मला इतकंच म्हणायचं आहे, सचिन तेंडुलकर सर्वश्रेष्ठ फलंदाज आहे.'

काय म्हणाला जेम्स अँडरसन?

' मला अजूनही आठवत नाहीये की, मी सचिनला बाद करण्यासाठी कुठली योजना आखली. ज्यावेळी तो मैदानावर यायचा त्यावेळी मी हाच विचार करायचो, मला चुकीचा चेंडू टाकायचा नाही. तो अशाप्रकारचा फलंदाज होता. तो भारतीय संघातील प्रमुख फलंदाज होता. जर भारतात खेळताना त्याला बाद केलं, तर मैदानात पूर्ण सन्नाटा पसरायचा. याहून तुम्ही अंदाज लावू शकता की, त्याची विकेट किती मोठी होती.'

जेम्स अँडरसन गेल्या २१ वर्षांपासून कसोटी क्रिकेट खेळतोय. आपल्या कारकीर्दीत त्याने आतापर्यंत ७०० हून अधिक गडी बाद केले आहेत. असा कारनामा करणारा तो जगातील पहिलाच वेगवान गोलंदाज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT