इंग्लंड आणि वेस्टइंडिद या दोन्ही संघांमध्ये कसोटी मालिकेचा थरार सुरु आहे. हा सामना जेम्स अँडरसनसाठी अतिशय खास आहे. कारण हा त्याच्या कसोटी कारकिर्दीतील शेवटचा सामना आहे. तब्बल २१ वर्ष कसोटी क्रिकेट खेळल्यानंतर तो कसोटी क्रिकेटला रामराम करणार आहे. त्याने लॉर्ड्सच्या मैदानावर आपल्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात केली होती आणि याच मैदानावर तो आपला शेवटचा सामना खेळतोय. दरम्यान या सामन्यात त्याने एक मोठा रेकॉर्ड मोडून काढला आहे.
जेम्स अँडरसन हा आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळत आहे. संपूर्ण कारकिर्दीत एकापेक्षा एक मोठे रेकॉर्ड्स आपल्या नावावर करणाऱ्या अँडरसनने शेवटच्या सामन्यातही मोठ्या रेकॉर्डला गवसणी घातली आहे. जेम्स अँडरसनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५० हजार चेंडू टाकण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. असा कारनामा करणारा तो जगातील चौथा आणि इंग्लंडचा पहिलाच गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी मुथय्या मुरलीधरन, अनिल कुंबळे आणि शेन वॉर्नने हा कारनामा केला होता.
इंग्लंड आणि वेस्टइंडिज या दोन्ही संघांमध्ये सुरु असलेल्या सामन्यात वेस्टइंडिजचा संघ दुसऱ्या दिवशी दुसऱ्या डावात १७१ धावांनी पिछाडीवर आहे. वेस्टइंडिजच्या ६ फलंदाजांनी पॅव्हेलियनची वाट धरली आहे. कारकिर्दीतील शेवटच्या सामन्यातही जेम्स अँडरसनच्या गोलंदाजीची जादू पाहायला मिळत आहे. त्याने एटकिंसनला बाद करत माघारी धाडलं. त्यानंतर कर्णधार क्रेग ब्रेथवेट आणि जेसन होल्डरला बाद करत माघारी धाडलं.
मुथय्या मुरलीधरन - ६३१३२ चेंडू
अनिल कुंबळे- ५५३४६ चेंडू
शेन वॉर्न - ५१३४७ चेंडू
जेम्स अँडरसन- ५०००१ चेंडू
जेम्स अँडरसन - ४०००० चेंडू
स्टूअर्ट ब्रॉड- ३३६९८ चेंडू
कोर्टनी अँड्रयू वॉल्श - ३००१९ चेंडू
ग्लेन मॅकग्रा - २९२४८ चेंडू
कपिल देव - २७७४० चेंडू
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.