Ishan Kishan’s SRH captaincy under question as Pat Cummins returns. saam tv
Sports

Ishan Kishan: सनरायझर्स हैदराबादला विजयाची हॅट्रिक मिळवून देऊनही इशानचं कर्णधारपद जाणार? काय आहे कारण?

Ishan Kishan SRH Captaincy: सनरायझर्स हैदराबादला सलग तीन विजय मिळवून देऊनही इशान किशनला कर्णधारपद गमवावे लागू शकते. काय आहे कारण जाणून घ्या.

Bharat Jadhav

यंदाच्या आयपीएल २०२६ मध्ये सनरायझर्स हैदराबाद जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. हैदराबादनं विजयाची हॅट्रिक मिळवली आहे. इशान किशनच्या नेतृत्वात संघानं शानदार कामगिरी केली आहे. तरीही इशान किशनच्या कर्णधारपद जाण्याची शक्यता आहे. त्यामागील कारण काय आहे हे जाणून घेऊ.

सनरायझर्स हैदराबाद संघाचा नियमित कर्णधार पॅट कमिन्स आता संघात सामील झाला आहे. हंगामाच्या सुरुवातीला कमिन्स उपस्थित नव्हता, त्यामुळे कर्णधारपदाची जबाबदारी इशान किशनकडे देण्यात आली होती.

सनरायझर्स हैदराबाद काय घेणार निर्णय?

इशान किशनच्या नेतृत्त्वाखाली हैदराबादनं शानदार कामगिरी केली आहे. सुरुवातीच्या पराभवांनंतर संघानं सुधारित गोलंदाजी आणि फलंदाजीच्या उत्तम समन्वयामुळे संघाने स्पर्धेत पुन्हा लय मिळवली आहे. कर्णधार म्हणून किशनचा सहजपणा आणि खेळाडूंसोबतचा बॉण्ड यामुळे हैदराबाद संघ एकजुटीनं विजयाला गवसणी घालत आहे.

मागील तीन सामन्यात सनरायझर्स हैदराबादनं विजय मिळवले आहेत. असे असूनही इशानला आपलं कर्णधारपद गमावावं लागेल. त्याचे कारण म्हणजे, पॅट कमिन्स आता संघात परत येणार आहे. दुखापतीमुळे तो काही सामन्यांना मुकला होता. परंतु तो आता परतला आहे. त्यामुळे संघाचं नेतृत्व कमिन्स करणार आहे. मात्र संघ व्यवस्थापन काय निर्णय घेणार हे पाहावे लागेल.

किशनच्या कर्णधारपदाला पाठिंबा

दरम्यान भारताचा माजी ऑफ-स्पिनर हरभजन सिंगने किशनला कर्णधारपदी कायम ठेवावे असे समर्थन केले आहे. हैदराबादने लगेचच कमिन्सकडे परत जाण्याचा मोह टाळावा. २०२४ मध्ये हैदराबाद संघाला अंतिम सामन्यापर्यंत नेण्यात कमिन्सचं योगदान शानदार होतं. त्याबद्दल हरभजनं कमिन्सचे कौतुक केलं. परंतु किशनच्या नेतृत्वाखाली सध्याची संघरचना संतुलित दिसत आहे. संघाने आपल्या शेवटच्या पाच सामन्यांपैकी चार जिंकलेत, असंही हरभजन म्हणाला.

पॅट कमिन्सकडून संघाचं आणि इशानचं कौतुक

२०२६च्या आयपीएलमध्ये संघानं शानदारी कामगिरी केली आहे. सुरुवातील काही पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र त्यानंतर संघानं पुनरागमन करत विजय मिळवले आहेत. संघाने चार सामन्यात शानदार विजय मिळवलाय. तर कर्णधार म्हणून इशान किशनने संघाचं नेतृत्व चांगल्या प्रकारे केलं आहे. दिल्ली विरुद्ध झालेल्या सामन्यात हैदराबादच्या संघाने जबरदस्त कामगिरी केली आहे, असं पॅट कमिन्सनं एका व्हिडिओतून म्हणाला आहे, हा व्हिडिओ संघ व्यवस्थापनाने आपल्या सोशल मीडियावरून शेअर केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kurkuri Bhendi Recipe : लहान मुलांसाठी ५ मिनिटांत बनवा कुरकुरी भेंडी, नोट करा रेसिपी

Maharashtra News Live Update: शासकीय कर्मचारी संघटनेचा संपाचा तिसरा दिवस

ठाणे रेल्वे स्टेशनजवळ 'शिवशाही'ला भीषण आग; बस जळून खाक, VIDEO

Kidney health: सकाळी उठल्यावर ही ५ लक्षणं दिसली तर समजा किडनी निकामी होतेय; कधी घ्याल डॉक्टरांचा सल्ला

Buldhana Police: बुलडाण्यात पोलिसाला सासू-सासऱ्यांकडून बेदम मारहाण, VIDEO होतोय व्हायरल

SCROLL FOR NEXT