ishan kishan shreyas iyer removed from bcci central contract list why hardik pandya not removed know the reason  yandex
Sports

BCCI Annual Contract: इशान - अय्यर OUT; मग हार्दिकला कॉन्ट्रॅक्टमध्ये का ठेवलं? समोर आलं खरं कारण

Hardik Pandya In BCCI Central Contract: इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांना बीसीसीआयने सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून बाहेर केलं आहे. या दोघांना सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून बाहेर केल्यानंतर हार्दिक पंड्या या कॉन्ट्रॅक्टमध्ये कसा?

Ankush Dhavre

BCCI Central Contract, Ishan Kishan- Shreyas Iyer:

इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांना बीसीसीआयने सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून बाहेर केलं आहे. या दोघांना सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून बाहेर केल्यानंतर हार्दिक पंड्या या कॉन्ट्रॅक्टमध्ये कसा? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे. या प्रश्नाचं उत्तर आता मिळालं आहे.

हार्दिक पंड्याने बीसीसीआय आणि निवडकर्त्यांना खात्री पटवून दिली आहे की, तो देशांतर्गत क्रिकेट खेळण्यासाठी उपलब्ध राहील. तर दुसरीकडे इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांना सातत्याने सांगूनही दोघंही रणजी ट्रॉफी स्पर्धा खेळण्यासाठी उपलब्ध राहिले नाहीत. त्यामुळे बीसीसीआयला टोकाची भूमिका घ्यावी लागली.

इशान किशन (Ishan Kishan) आणि श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) सेंट्रल कॉन्ट्रॅक्टच्या यादीतून वगळल्यानंतर हार्दिक पंड्याचा ग्रेड ए मध्ये समावेश करण्यात आला आहे. यानुसार हार्दिक पंड्याला वर्षाला ५ कोटी रुपये मिळणार आहेत. इशान किशन आणि श्रेयस अय्यर हे देशांतर्गत क्रिकेटपासून दूर होते त्यामुळे ही कारवाई करण्यात आली. मग हार्दिक पंड्याही (Hardik Pandya) वर्ल्डकपनंतर संघाबाहेर आहे, त्याच्यावर ही कारवाई का नाही? (Cricket news in marathi)

इंडीयन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, निवडकर्त्यांचं असं म्हणणं आहे की, हार्दिक पंड्या अजूनही पूर्णपणे फिट नाही. त्याला मैदानावर कमबॅक करण्यासाठी आणखी वेळ लागेल. जेव्हा तो पूर्णपणे फिट होईल तेव्हा तो आपल्या संघाकडून देशांतर्गत क्रिकेटमध्ये कमबॅक करताना दिसून येईल. मात्र तो कसोटीत परतणार का? याबाबत कुठलंही स्पष्टीकरण आलेलं नाही.

जय शाह यांनी एका कार्यक्रमात म्हटले होते की, आगामी टी -२० वर्ल्डकप स्पर्धेत रोहित शर्मा भारताचा कर्णधार असेल. त्यामुळे हार्दिक पंड्या उपकर्णधाराची भूमिका बजावताना दिसून येऊ शकतो. तर दुसरीकडे इशान किशन आणि श्रेयस अय्यर भारतीय संघात केव्हा कमबॅक करणार हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hindi Langauge Row: हिंदी सक्तीच्या जीआरची होळी प्रकरणी २५० ते ३०० जणांवर गुन्हा; आंदोलनात उद्धव ठाकरे यांचीही उपस्थिती | VIDEO

Relationship Tips : महिलांच्या मनातलं कसं ओळखायचं?

Uddhav Thackeray Video: 'जय गुजरात'; नारा देताना उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडिओ, एकनाथ शिंदेंवरील टीकेनंतर शिवसेनेकडून व्हिडिओ व्हायरल

Pandharpur : विठुरायाच्या पद स्पर्शासाठी ५ किमीपर्यंत लांबच लांब रांगा | VIDEO

Maharashtra Live News Update: भारंगी नदीत वृद्धाने घेतली उडी; घटना सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद

SCROLL FOR NEXT