बीसीसीआयने दिलेल्या आदेशाचं पालन न करणं श्रेयस अय्यर आणि इशान किशनला महागात पडलं आहे. दोघांनाही रणजी खेळण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र या आदेशाचं पालन न केल्याने दोघांनाही सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून बाहेर करण्यात आलं आहे. इशान किशनने वैयक्तिक कारणास्तव भारतीय संघातून माघार घेतली होती. त्यानंतर त्याला रणजी खेळण्याचा सल्ला देण्यात आला होता. मात्र तो आयपीएल स्पर्धेचा सराव करताना दिसून आला.
इशान - अय्यरला फॅन्सचा सपोर्ट..
तर दुसरीकडे श्रेयस अय्यरला इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात स्थान दिलं गेलं होतं. मात्र मालिकेतील सुरुवातीच्या २ सामन्यांमध्ये तो पूर्णपणे फ्लॉप ठरला. दरम्यान त्याला संघातून बाहेर करत रणजी स्पर्धा खेळण्याचा सल्ला दिला गेला. (Cricket news in marathi)
त्यानेही या स्पर्धेला प्राधान्य दिलं नाही. बीसीसीआयने या आधीही स्पष्ट केलं आहे, जे खेळाडू राष्ट्रीय संघाकडून खेळत नसतील त्यांनी देशांतर्गत क्रिकेटला प्राधान्य दिलं पाहिजे. अन्यथा कठोर कारवाई केली जाईल. या दोघांनाही सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून बाहेर केल्यानंतर क्रिकेट चाहत्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सपोर्ट केला आहे.
एका युजरने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिले की, ' श्रेयस अय्यर संपूर्ण २०२३ वर्ल्डकप स्पर्धेत उपलब्ध होता. त्याने ६६.२५ च्या सरासरीने ५३० धावा केल्या. तरीदेखील त्याला बाहेर केलं गेलं. एक क्रिकेटपटू जो २०२३ वर्ल्डकप स्पर्धेच्या मध्येच दुखापतग्रस्त झाला. ६ महिने क्रिकेटपासून दूर आहे आणि आयपीएलसाठी फिट आहे. अशा खेळाडूला ग्रेड ए मध्ये ठेवलं आहे.'
तसेच आणखी एका युजरने लिहिले की, ' इशान किशन आणि श्रेयस अय्यर हे रणजी ट्रॉफी सोडणारे पहिले आणि शेवटचे क्रिकेटपटू नाहीत..' बीसीसीआयने काही दिवसांपूर्वी सर्व खेळाडूंना पत्र लिहिलं होतं. ज्यात असं म्हटलं गेलं होतं की, जे खेळाडू राष्ट्रीय संघातून बाहेर आहेत त्यांनी आपल्या संघातून रणजी क्रिकेट खेळावं. काही क्रिकेटपटू फिटनेस टिकून राहावा म्हणून देशांतर्गत क्रिकेट सोडून आयपीएल स्पर्धेसाठी सराव करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.