ishan kishan saam tv
Sports

KL Rahul Ruled Out: ईशान किशन की संजू सॅमसन? केएल राहुल बाहेर झाल्यानंतर कोणाला मिळणार संधी?

Asia Cup 2023: ईशान किशन की संजू सॅमसन संघात यष्टीरक्षक फलंदाज म्हणून कोणाला मिळणार संधी?

Ankush Dhavre

Ishan Kishan -Sanju Samson:

भारतीय संघासाठी येणारे काही दिवस अतिशय महत्वाचा असणार आहे. कारण भारतीय संघाला आशिया चषक आणि वनडे वर्ल्डकपसारख्या मोठ्या स्पर्धा खेळायच्या आहेत. आशिया चषक स्पर्धा काही तासांवर असताना भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे.

संघातील प्रमुख फलंदाज केएल राहुल पूर्णपणे फिट नसल्याने पाकिस्तान आणि नेपाळविरूद्ध होणाऱ्या सामन्यांना मुकणार आहे.

त्यामुळे केएल राहुलच्या जागी कोण खेळणार? हा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. केएल राहुलच्या अनुपस्थितीत भारतीय संघात काही मोठे बदल पाहायला मिळु शकतात.

वर्ल्डकपच्या दृष्टीने संघबांधणी करण्यासाठी केएल राहुल पूर्णपणे फिट नसतानाही त्याला संघात स्थान दिलं गेलं होतं. त्याचा अनुभव पाहता यष्टीरक्षक फलंदाज म्हणून त्याची जागा जवळ जवळ निश्चित होती.

तसेच फलंदाजी करताना तो पाचव्या क्रमांकावर येणार असं म्हटलं जात होतं. मात्र आता तो २ सामने संघाबाहेर राहणार आहे. २ सप्टेंबर रोजी होणारा पाकिस्तानविरूद्धचा सामना भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे.

या सामन्यात केएल राहुलच्या स्थानी खेळण्यासाठी भारतीय संघाकडे ईशान किशन आणि संजू सॅमसनचा पर्याय उपलब्ध आहे. (Latest sports updates)

ईशान किशन की संजू सॅमसन?

आशिया चषकासाठी जेव्हा भारतीय संघाची घोषणा करण्यात आली होती, त्यावेळी ईशान हा केएल राहुलचा पर्यायी यष्टीरक्षक असल्याचं म्हटलं गेलं होतं. आता केएल राहुल बाहेर झाल्यानंतर ईशान किशनला प्लेइंग ११ मध्ये संधी मिळण्याची शक्यता वाढली आहे.

ईशान किशनच्या येण्याने भारतीय संघात डाव्या हाताच्या फलंदाजाची कमतरता देखील भरून निघणार आहे.

नेहमी डावाची सुरूवात करणाऱ्या ईशान किशनला पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात मध्यक्रमात फंलदाजी करावी लागणार आहे.

जर ईशान किशन मध्यक्रमात खेळण्यासाठी फिट बसत नसेल तर भारतीय संघाकडे आणखी एक पर्याय शिल्लक आहे, तो म्हणजे संजू सॅमसनला खेळवण्याचा. संजू सॅमसनला या संघात राखीव यष्टीरक्षक फलंदाज म्हणून संघात स्थान दिलं गेलं आहे.

संजू सॅमसन कुठल्याही क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. त्यामुळे संजू सॅमसनलाही प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT