Ishan Kishan SRH VS MI IPL 2025 X
Sports

Ishan Kishan : आधी वाइड, मग अपील.. अंपायरचा गोंधळ, नंतर विकेटची घोषणा; तरीही इशान किशन आउट नव्हता?

SRH VS MI IPL 2025 : आयपीएल २०२५ मधील ४१ वा सामना सुरु आहे. सनरायजर्स हैदराबादचे फलंदाज प्रथम फलंदाजी करत आहेत. मुंबईच्या गोलंदाजांनी सामन्याच्या सुरुवातीलाच हैदराबादवर दबाव टाकला आहे.

Yash Shirke

SRH VS MI : सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स हा सामना सुरु आहे. या सामन्यामध्ये हार्दिक पंड्याने टॉस जिंकला आणि मुंबई इंडियन्सचा संघ गोलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला. ट्रेव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा हे हैदराबादचे खेळाडू फलंदाजीसाठी आले. हा सामना हैदराबादच्या एकाना स्टेडियमवर रंगला आहे.

ट्रेव्हिस हेड शून्यावर बाद झाला. ट्रेंट बोल्डने त्याच्या पहिल्या ओव्हरमध्ये मुंबईची डोकेदुखी ठरु शकणाऱ्या हेडला बाद केले. त्यानंतर लगेच दीपक चहर गोलंदाजीसाठी आला. त्याच्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर इशान किशन कॅचआउट झाला. विकेटकिपर रायन रिकल्टनने स्टंपमागे कॅच पकडून इशानला माघारी पाठवले.

नेमकं काय घडलं?

तिसऱ्या ओव्हरमध्ये दीपक चहर गोलंदाजी करत होता. पहिल्या चेंडू टाकल्यावर इशान किशन शॉट मारण्याचा प्रयत्न केला. बॅटचा एज लागून चेंडू विकेटकिपरकडे गेल्याचे इशानला वाटले. त्याला सुरुवातीला अंपायरने वाइडचा कॉल दिला. त्यानंतर दीपक चहरने अपील केल्यानंतर अंपायरने निर्णय बदलला आणि इशान आउट झाल्याची घोषणा केली. बॅट चेंडूला लागल्याचे इशानला वाटले त्यामुळे त्यानेही डीआरएस न घेण्याचा निर्णय घेतला.

मुंबई इंडियन्सची प्लेईंग ११ -

रायन रिकल्टन, विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ड, जसप्रीत बुमराह, विग्नेश पुथूर.

सनरायजर्स हैदराबादची प्लेईंग ११ -

अभिषेक शर्मा, ट्रेव्हिस हेड, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन, अनिकेत वर्मा, पॅट कमिन्स (कर्णधार), जयदेव उनदकट, हर्षल पटेल, ईशान मलिंगा, झीशान अन्सारी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : दहिसरहुन गुंदवलीला येणाऱ्या मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड

How To Increase Stamina : शरीराची ताकद वाढविण्यासाठी काय खावे?

Nikki Tamboli: बाईsss... निक्कीचे मेकअप साहित्य येतं लंडनहून, कोणत्या प्रॉडक्टची किंमत किती?

Ladki Bahin Yojana: ईकेवायसी करताना झालेली चूक दुरुस्त करायचीये? लाडक्या बहिणींनो ही स्टेप बाय स्टेप प्रोसेस फॉलो करा

Rajya Sabha election : शरद पवारांच्या नावाला काँग्रेसमधून विरोध? हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT