SRH VS MI : काळी फित बांधून खेळाडू उतरले मैदानात, पहलगाम हल्ल्याचा सामन्यावर काय परिणाम झाला?

SRH VS MI IPL 2025 : सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स हा सामना आज एकाना स्टेडियमवर खेळला जाणार आहे. यात मुंबईने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हैदराबादचा संघ प्रथम फलंदाजी करणार आहे.
SRH VS MI IPL 2025
SRH VS MI IPL 2025X
Published On

SRH VS MI Updates : राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आज सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स हा सामना सुरु झाला आहे. सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे हा संघ प्रथम फलंदाजी करणार आहे. वानखेडे स्टेडियमवर मुंबईने हैदराबादचा दारुण पराभव केला होता. या पराभवाचा वचपा हैदराबादचा संघ काढण्याच्या बेतात आहे.

टॉसदरम्यान हर्षा भोगले यांनी हार्दिक पंड्या आणि पॅट कमिन्स या दोन्ही कर्णधारांशी संवाद साधला. दोघांनीही कालच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा जाहीर निषेध केला. काश्मीरच्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यातील मृतकांना श्रद्धांजली म्हणून सामन्यापूर्वी एक मिनिट मौन पाळण्यात आले. भ्याड हल्ल्याचा निषेध म्हणून हैदराबाद आणि मुंबई या दोन्ही संघांच्या खेळाडूंसह सर्वांनी हातावर काळी पट्टी बांधली आहे. आजच्या सामन्यात चियरलीडर्स, डीजे, आतषबाजी रद्द करण्यात आले आहेत.

SRH VS MI IPL 2025
Pahalgam Attack : निष्पाप भारतीयांची हत्या करणे हा पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, पहलगाम हल्ल्यावर संतापला माजी क्रिकेटपटू

टॉस झाल्यानंतर दोन्ही कर्णधारांनी आपापल्या ११ शिलेदारांच्या नावाची घोषणा केली. मुंबईने मागच्या सामन्यात अश्वनी कुमारला संधी दिली होती. आजच्या सामन्यामध्ये अश्वनीच्या जागी विग्नेश पुथुरला संघात सामील करण्यात आले आहे. खराब फॉर्ममुळे हैदराबादच्या संघाने मोहम्मद शमीला प्लेईंग ११ मधून वगळले आहे.

SRH VS MI IPL 2025
Pahalgam Terrorist Attack : पहलगाम हल्ल्याचे क्रिकेटवर पडसाद, भारत-पाकिस्तान सामन्यांबद्दल बीसीसीआय घेणार मोठा निर्णय?

मुंबई इंडियन्सची प्लेईंग ११ -

रायन रिकल्टन, विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ड, जसप्रीत बुमराह, विग्नेश पुथूर.

सनरायजर्स हैदराबादची प्लेईंग ११ -

अभिषेक शर्मा, ट्रेव्हिस हेड, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन, अनिकेत वर्मा, पॅट कमिन्स (कर्णधार), जयदेव उनदकट, हर्षल पटेल, ईशान मलिंगा, झीशान अन्सारी.

SRH VS MI IPL 2025
'बीसीसीआयची भ्रष्टाचार विरोधी संस्था आता...'; राजस्थान रॉयल्सवर मॅच फिक्सिंगचे आरोप, BCCI ने थेट स्पष्टीकरण देत विषयच संपवला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com