irfan pathan vs Shahid afridi google
Sports

Irfan Pathan Vs Shahid Afridi: 'मर्द असशील तर समोर येऊन बोल'; शाहिद आफ्रिदीचं इरफान पठानला ओपन चॅलेंज

Shahid Afridi Attack On Irfan Pathan Before IND vs Pak Match: आशिया कप २०२५ च्या सुपर-४ मध्ये २१ सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा आमनेसामने येतील. याआधी, पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने भारतीय क्रिकेटपटूवर वादग्रस्त विधान केले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू आणि कॉमेंटेटर इरफान पठाण याच्या संदर्भात वादग्रस्त विधान केले आहे. काही दिवसांपूर्वी इरफान पठाणने, एका मुलाखतीदरम्यान टीम इंडिया पाकिस्तान दौऱ्यावर असताना शाहीद अफ्रिदी आणि त्याच्यात झालेल्या वादाचा किस्सा सांगितला होता. २००६ मध्ये टीम इंडिया पाकिस्तान दौऱ्यावर होती. यावेळी दोन्हीही संघ एकाच विमानातून प्रवास करत होते. प्रवासादरम्यान या दोन्ही खेळाडूंमध्ये वाद झाला.

आफ्रिदीने इरफान पठाणच्या डोक्यावर हात ठेवत त्याला "बाळ" असे म्हटले होते. यावर, अफ्रिदीने कुत्र्याचे मांस खाल्ले असेल, ज्यामुळे तो भुंकत आहे. असे उत्तर इरफान पठानने दिले. इरफान पठानचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. आता, शाहीद अफ्रिदीने पुन्हा एकदा इरफान पठानला डिवचले आहे. आफ्रिदीचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये त्याने इरफान पठाणला समोरासमोर बोलण्याचे आव्हान दिले आहे.

मी त्यालाच मर्द मानतो जो... अफ्रिदीचे वादग्रस्त वक्तव्य

एका पाकिस्तानी टीव्ही चॅनेलवर बोलताना शाहिद आफ्रिदी म्हणाला, मी त्यालाच मर्द मानतो जो माझ्या डोळ्यात पाहून समोरासमोर बोलू शकतो. इरफान पठाण माझ्या पाठीमागे बोलतो. तो माझ्या तोंडावर काही बोलला तरच मी त्याला उत्तर देऊ शकतो. त्याच्या खोट्या गोष्टींना मी कसे उत्तर देऊ शकतो? तरीही मी रझ्झाकला अल्लाहची गाय म्हणतो. तो पुढे म्हणाला, मला वाटतं तो पाकिस्तानींच्या विरोधात बोलून एक महान भारतीय आहे, हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे. बिचारा आयुष्यभर हेच सिद्ध करत राहील.

इरफान पठाणचे चोख प्रत्युत्तर

आफ्रिदीची टीव्ही मुलाखत व्हायरल झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी, इरफान पठाणने लगेच प्रतिक्रिया दिली. कोणाचेही नाव न घेता, त्याने सोशल मीडियावर पोस्ट केले, 'तुम्ही बरोबर आहात, हे शेजारी, माजी खेळाडू आणि मीडियाला इरफान पठाणच्या नावाचे वेड लागले आहे.

नेमकं प्रकरण काय

एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत इरफान पठाणने २००६ च्या पाकिस्तान दौऱ्यावर घडलेला किस्सा सांगितला, तो म्हणाला, 'आम्ही कराचीहून लाहोरला जाणाऱ्या विमानात होतो. भारतीय आणि पाकिस्तानी संघ विमानात एकत्र प्रवास करत होते. यादरम्यान, आफ्रिदीने इरफानच्या डोक्यावर हात ठेवला आणि विचारले, बाळा, तू कसा आहेस? उत्तरात इरफान म्हणाला, तू कधीपासून माझा बाप झालास? यादरम्यान, इरफानने अब्दुल रझ्झाकला विचारले, येथे कोणत्या प्रकारचे मांस मिळते? अब्दुल रझ्झाकने यादी सांगितल्यावर इरफानने विचारले की, येथे 'कुत्र्याचे मांस मिळते का?' कारण आफ्रिदी ते मास खाऊन भुंकत आहे. हे ऐकून आफ्रिदी संतापला, परंतु तो गप्प राहिला आणि विमानमधील वातावरण अचानक शांत झाले. इरफान पठानने हा किस्सा शेअर केल्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नमाज पडतानाच पडला बॉम्ब, क्षणातच मशिद झाली कब्रस्तान

परप्रांतीयांना जमीन विकायची नाही,कोकणातल्या गावाचा आदर्श ठराव

Latur Crime: लातूर हत्याप्रकरण; राष्ट्रवादी पदाधिकारी अनमोल कवठे, सोनाली भोसलेच्या हत्येपूर्वीचा व्हिडिओ आला समोर

Raw Banana: कच्ची केळी खाल्ल्याने शरीराला कोणते फायदे होतात?

Poonam Pandey: दिल्लीच्या रामलीलेत पूनम पांडेची एंट्री; मंदोदरीच्या भूमिकेवरून पेटला नवा वाद

SCROLL FOR NEXT