irfan pathan slams hardik pandya over his hitting ability icc t20 world cup 2024
irfan pathan slams hardik pandya over his hitting ability icc t20 world cup 2024  twitter
क्रीडा | IPL

Hardik Pandya: 'हार्दिक पंड्याची पावर कमी होतेय..' माजी खेळाडूचा जिव्हारी लागणारा वार

Ankush Dhavre

भारतीय संघाचा माजी खेळाडू इरफान पठाणने मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. आयपीएल २०२४ स्पर्धेत सोमवारी(२२ एप्रिल) झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यात हार्दिक पंड्या संघर्ष करताना दिसून आला होता. या सामन्यात तो अवघ्या १० धावा करत माघारी परतला.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या मुंबई इंडियन्स संघाला १७९ धावा करता आल्या होत्या. या डावात हार्दिक पंड्या सातव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी मैदानावर आला होता. मात्र त्याला १० चेंडूंचा सामना करत अवघ्या १० धावा करता आल्या. फलंदाजी, गोलंदाजीसह तो नेतृत्व करतानाही संघर्ष करताना दिसून येत आहे. त्याच्या नेतृत्वाखाली खेळताना मुंबई इंडियन्सला ८ पैकी केवळ ३ सामने जिंकता आले आहेत. तर ५ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.

हार्दिक पंड्याची ही फ्लॉप कामगिरी पाहता इरफान पठाणने एक ट्विट केलं आहे. ज्यात त्याने म्हटलं आहे की, 'हार्दिक पंड्या सध्या ज्या फॉर्ममध्ये आहे ते पाहता तो टी-२० वर्ल्डकपमध्ये भारतीय संघासाठी डोकेदुखी ठरु शकतो. त्याची मोठे फटके खेळण्याची क्षमता खालावली आहे. ही मोठी समस्या आहे. वानखेडे त्याची फलंदाजी वेगळीच होती. मात्र ज्या खेळपट्टीवर फलंदाजांना मदत मिळत नाहीये, अशा खेळपट्टीवर तो संघर्ष करताना दिसून येत आहे. '

आयपीएल २०२४ स्पर्धेत असा राहिलाय रेकॉर्ड...

हार्दिक पंड्या या हंगामात मुंबई इंडियन्स संघाचं नेतृत्व करतोय. त्याच्या नेतृत्वाखाली खेळताना मुंबई इंडियन्स संघाला ८ पैकी केवळ ३ सामने जिंकता आले आहेत. तर ५ सामने गमवावे लागले आहेत. तर फलंदाजी करताना त्याला अवघ्या १५१ धावा करता आल्या आहेत. तर गोलंदाजी करताना त्याला अवघ्या ४ गडी बाद करता आले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ruturaj Gaikwad Statement: चेन्नईचं नेमकं चुकलं तरी कुठं? कर्णधार ऋतुराज गायकवाडने सांगितली पराभवाची कारणं

Nawazuddin Siddiqui Birthday : मेडिकल केमिस्ट- वॉचमॅन ते सुपरस्टार; जाणून घ्या नवाजुद्दीन सिद्दीकीचा संघर्षमय प्रवास

Today's Marathi News Live: मोठी बातमी! एअर इंडियाच्या विमानाच्या इंजिनला भीषण आग

Chakan Gas Tanker Explosion: पुण्यात गॅस टँकरचा स्फोट कसा झाला?, समोर आली धक्कादायक माहिती

Milk Powder : दूध नसल्यास तुम्हीसुद्धा मिल्कपावडरचा जास्त वापर करता? वाचा आरोग्यावर होणारा परिणाम

SCROLL FOR NEXT