Irfan Pathan Saam tv
Sports

Irfan Pathan : कुत्र्याचं मांस खाल्ल असल्याने...; विमानात इरफान पठाण आणि शाहिद आफ्रिदीमध्ये राडा, काय आहे संपूर्ण प्रकरण?

Irfan Pathan vs Shahid Afridi : विमानात इरफान पठाण आणि शाहिद आफ्रिदीमध्ये राडा झाला होता. जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Vishal Gangurde

टीम इंडियाचा माजी खेळाडू इरफान पठाण आणि पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदीमध्ये काही वर्षांपूर्वी विमानात शाब्दिक वाद झाला होता. दोन्ही खेळाडूंचं विमानात चांगलंच वाजलं होतं. दोघांच्या जुन्या भांडणाची पुन्हा एकच चर्चा सुरु झाली आहे.

इरफान पठाण आणि शाहिद आफ्रिदी दोघेही अनेक सामन्यात एकत्र खेळले आहेत. इरफान पठानने कित्येकदा आफ्रिदीला शून्यावर बाद केलं आहे. इरफान पठानने पाकिस्तानविरोधात ६७ विकेट घेतले आहेत. तर ८०७ धावा कुटल्या आहेत. यात एक शतक आणि हॅट्रिक विकेटचा समावेश आहे.

इरफानने सांगितलं की, 'टीम इंडिया २००६ साली पाकिस्तानच्या दौऱ्यावर होती. दोन्ही संघ कराचीहून लाहोरला विमानाने निघाले होते. विमानात शाहिद आफ्रिदीसोबत वाजलं. त्याने माझ्या केसावरून हात फिरवला'.

'लल्लनटॉप'ला मुलाखत देताना इरफान पुढे म्हणाला, 'शाहीद आफ्रिदीने केसावरून हात फिरवून म्हटलं की, बाळा कसा आहेस? असं म्हटलं. मी तातडीने म्हटलं की, तू केव्हापासून बाप झाला? तू कशाला लहान मुलांसारखा वागतोय. माझ्या केसाला कशाला हात लावतोय. माझे केस कशाला खराब करतोय. तुझ्यासोबत माझी मैत्री नाही, तरी उद्धटपणा का करतोय'.

इरफान पठाने पुढे सांगितलं की, 'अब्दुल रज्जाक सोबत होता. मी अब्दुलला विचारलं की, इथे कोणतं मांस मिळतं? मी त्याला पुढे विचारलं की, 'कुत्र्याचं मांस मिळतं का? मी भडकलो होतो'. शाहिद आफ्रिदीची सीट बाजूलाच होती. तो म्हणला, इरफान असं का बोलत आहे?'.

मी म्हणालो, 'त्याने कुत्र्याचं मांस खाल्लं आहे. त्यामुळे कधीपासून भुंकत आहे. यानंतर तो चांगलाच भडकला. रागाने त्याचे डोळे लाल झाले होते. पण तो काहीच बोलू शकला नाही. खरंतर त्यांच्याकडे काहीच उत्तर नव्हतं. तो काही बोलल्यावर मी तोच डायलॉग मारायचो. त्यानंतर विमानाचं वातावरण शांत झालं'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

टॅरिफनंतर भारताला आणखी एक धक्का, अमेरिकेनं घेतला मोठा निर्णय, लाखो लोकांवर थेट परिणाम

Passport Free Travel : या देशात फिरण्यासाठी लागणार नाही पासपोर्ट, भारतापेक्षाही कमी असेल खर्च

Pune: विसर्जन मिरवणुकीत भयंकर घडलं; महिला पत्रकाराचा विनयभंग, ढोल ताशा पथकाच्या सदस्यावर आरोप

Maharashtra Live News Update: पुण्यात ढोल ताशा पथकातील सदस्याकडून महिला पत्रकाराचा विनयभंग

Ankita Walawalkar: बिग बॉस मराठीमधून प्रसिद्ध झालेल्या अंकिता वालावलकरचं वय किती?

SCROLL FOR NEXT