irfan pathan instagram
Sports

Irfan Pathan Dance: अफगाणिस्तानच्या विजयानंतर इरफान पठाणचा भन्नाट डान्स; पण राशिद खानने घेतला आक्षेप- VIDEO

Irfan Pathan Dance Afghanistan Victory Against England: अफगाणिस्तान आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पार पडला. या सामन्यानंतर इरफान पठाणने शानदार डान्स केलाय.

Ankush Dhavre

भारतात झालेल्या आयसीसी वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत अफगाणिस्तानने बड्या संघांना एकापाठोपाठ एक मोठे धक्के दिले होते. या स्पर्धेत अफगाणिस्तानने पाकिस्तानला हरवल्यानंतर इरफान पठाणने शानदार डान्स केला होता. हा डान्स कोणीच विसरु शकत नाही. जो व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.

आता अफगाणिस्तानने इंग्लंडला पराभूत केल्यानंतर इरफान पठाणला पुन्हा एकदा डान्स करण्याची संधी मिळाली. रोमांचक सामन्यात अफगाणिस्तानने इंग्लंडला धूळ चारत सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी दावा केला. दरम्यान या विजयानंतर इरफान पठाणने डान्स केला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

इरफान पठाणने केलेल्या डान्सवर अफगाणिस्तानचा स्टार गोलंदाज राशिद खानने आक्षेप घेतला आहे. इरफान पठाणचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, राशिद खानने कमेंट केली. कमेंटमध्ये त्याने लिहिले की,' भाईजान माझ्याशिवाय डान्स केला..' या कमेंटसह राशिदने इरफान पठाणचे आभारही मानले.

अफगाणिस्तानचा शानदार विजय

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत बुधवारी झालेल्या सामन्यात अफगाणिस्तान आणि इंग्लंड हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात अफगाणिस्तानचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आला. अफगाणिस्तानकडून प्रथम फलंदाजी करताना इब्राहिम जादरानने सर्वाधिक १७७ धावांची खेळी केली.

या खेळीच्या बळावर अफगाणिस्तानने ५० षटकअखेर ३२५ धावांचा डोंगर उभारला होता. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेला इंग्लंडचा संघ विजयाच्या अगदी जवळ पोहोचला होता. इंग्लंडकडून जो रुटने शानदार शतकी खेळी केली. त्याने इंग्लंडचा विजय खेचून आणला होता. मात्र शेवटी अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी दमदार गोलंदाजी केली आणि संघाला विजय मिळवून दिला.

या सामन्यातील शेवटच्या षटकात इंग्लंडला जिंकण्यासाठी १३ धावा करायच्या होत्या. या धावांचा बचाव करताना अफगाणिस्तानने इंग्लंडचा डाव संपुष्टात आणला आणि संघाला विजय मिळवून दिला. या विजयासह इंग्लंडने सेमीफायनलमध्ये जाण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल टाकलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: "भ्रष्टाचाऱ्यांसाठी जेल म्हणजे भाजप कार्यालय"; अनिल गोटेंचा सरकारवर घणाघात

Viral Video : धावती कार डिव्हायडरला धडकली अन् चार वेळा गरगरा फिरली, अपघाताचा भयंकर व्हिडिओ

Maval : मैत्रिणींसोबत खेळत असताना अनर्थ घडला; आद्रा धरणाच्या पाण्यात बुडून युवतीचा मृत्यू

Face Serum Tips: फेस सीरम लावण्याची योग्य पद्धत कोणती?

Mysterious stories from Mahabharata: शत्रू असूनही दुर्योधनाने अर्जुनाला का दिले होते ३ पराक्रमी बाण?

SCROLL FOR NEXT