मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामन्यात अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेडच्या फलंदाजांनी आयपीएलमधील तापमान वाढवलं. सनरायझर्सच्या फलंदाजांच्या स्फोटक खेळीने अनेक विक्रम रचले आहेत. ट्रॅव्हिस हेडने १८ चेंडूत अर्धशतक झळकावले. यासह हेड आयपीएलच्या इतिहासात एसआरएचसाठी सर्वात जलद अर्धशतक झळकावणारा खेळाडू ठरला, परंतु काही मिनिटांतच २३ वर्षीय अभिषेक शर्माने हा विक्रम मोडला.(Latest News)
त्याने अवघ्या १६ चेंडूत षटकार आणि चौकार लगावत अर्धशतक पूर्ण केलं. या सामन्यात त्याने ट्रॅव्हिस हेडसह अवघ्या २२ चेंडूत ६८ धावांची भागीदारी करत मुंबईच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. या सामन्यात अभिषेक शर्माने केवळ २३ चेंडू खेळले, ज्यात त्याने ३ चौकार आणि ७ षटकारांसह ६३ धावांची स्फोटक खेळी खेळली.
आयपीएल २०२४ मधील त्याच्या पहिल्या सामन्यात म्हणजेच केकेआरविरुद्ध त्याने १९ चेंडूत ३२ धावांची खेळी खेळली. यापूर्वी आयपीएलमध्ये हैदराबादच्या कोणत्याही खेळाडूला २० पेक्षा कमी चेंडूत अर्धशतक झळकावता आले नव्हते, मात्र शर्माने अवघ्या १६ चेंडूत हा पराक्रम केला.
दरम्यान, अभिषेक शर्माने २०१८ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले. आत्तापर्यंत त्याने ४९ सामने खेळले असून त्यात त्याने ९७५ धावा केल्या आहेत. या छोट्या कारकिर्दीत त्याने ५ अर्धशतकांच्या खेळीही केल्या आहेत. अभिषेक आयपीएल २०२४ मध्ये सनरायझर्ससाठी सलामीवीर म्हणून मैदानात उतरत असतो. त्याने आतापर्यंत ज्याप्रकारे धावा केल्या आहेत.ते पाहता तो आयपीएल २०२४ मध्ये ऑरेंज कॅपसाठी प्रबळ दावेदारांपैकी एक ठरले असे वाटते आहे.
दुसरीकडे या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज ट्रॅव्हिस हेडने २४ चेंडूत ६२ धावांची दमदार खेळी करत मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला. ट्रॅव्हिस हेडने ६२ धावांच्या या खेळीत ९ चौकार आणि ३ उंच षटकारही ठोकले. आज हैदराबाद येथे झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी निवडली. परंतु कर्णधार हार्दिक पांड्याचा पुन्हा एकदा निर्णय चुकला. हैदराबादच्या फलंदाजांनी मुंबईच्या गोलंदाजांना आस्मान दाखवलं.
ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांनी सुरुवातीच्या तासातच हार्दिकचा निर्णय चुकीचा ठरल्याचं सिद्ध केलंय. क्लासेनने ३४ चेंडूत ८० धावा केल्या. ट्रेविस हेडने २४ चेंडूमध्ये ६२ धावा केल्या.यात ९ चौकार आणि ३ षटकारचा समावेश आहे. त्यानंतर अभिषेक शर्माने मुंबईच्या गोलंदाजांना जोरदार चोप देत १६ चेंडूत अर्धशतक केलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.