इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२४ च्या ८ व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स हे संघ आमनेसामने आहेत. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सनरायझर्सच्या खेळाडूंनी रुद्ररुप धारण करत मुंबईच्या गोलंदाजाची जोरदार धुलाई केली. निर्धारित २० षटकात हैदराबादच्या संघाने ३ विकेट गमावत २७७ धावा करत सर्वात मोठा स्कोअर केला. क्लासेनने २३ चेंडू अर्धशतक केलं. तर अभिषेक शर्माने १६ चेंडूमध्ये अर्धशतक केलं. या दोघांच्या खेळीने हैदराबादने मुंबईसमोर २७८ धावांचे आव्हान ठेवलं आहे. (Latest News)
मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी निवडली. परंतु कर्णधार हार्दिक पांड्याचा पुन्हा एकदा निर्णय चुकला. हैदराबादच्या फलंदाजांनी मुंबईच्या गोलंदाजांना आस्मान दाखवलं. ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांनी सुरुवातीच्या तासातच हार्दिकचा निर्णय चुकीचा ठरल्याचं सिद्ध केलंय.
क्लासेनने क्लास खेळी करत मु्ंबईच्या गोलंदाजाला गुडघे टेकायला लावले. क्लासेनने ३४ चेंडूत ८० धावा केल्या. ट्रेविस हेडने २४ चेंडूमध्ये ६२ धावा केल्या.यात ९ चौकार आणि ३ षटकारचा समावेश आहे. त्यानंतर अभिषेक शर्माने मुंबईच्या गोलंदाजांना जोरदार चोप देत १६ चेंडूत अर्धशतक केलं. त्यानेही २३ चेंडूमध्ये ६३ धावा केल्या, यात ३ चौकार आणि ७ षटकाराचा समावेश आहे. या दोन्ही फंलदाजांनी मनसोक्त फटकेबाजी केल्यानंतर मैदानात आलेल्या माक्रमने नाबाद राहत २८ चेंडूत ४२ धावा केल्या. यात २ चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. या सर्वांच्या दमदार खेळीने हैदराबादने त्यानंतर आयपीएलच्या इतिहासात मोठा विक्रम केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.