IPL 2026 Points Table saam tv
Sports

IPL 2026: पराभव KKR चा, फटका मात्र CSK ला; हैदराबादच्या विजयाने बदललं पॉईंट्स टेबलचं समीकरण

IPL 2026 Points Table: सनरायझर्स हैदराबादने केकेआरवर विजय मिळवल्यानंतर आयपीएल 2026 पॉईंट्स टेबलमध्ये मोठा बदल झाला आहे. सहा टीमचे गुण समान असून नेट रन रेटमुळे क्रमवारी ठरतोय.

Surabhi Jayashree Jagdish

आयपीएलमध्ये दर दिवशी थरारक सामना पाहायला मिळतो. गुरुवारी झालेल्या सामन्यात सनराझर्स हैदराबादने कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव केला. अजिंक्य रहाणेच्या नेतृ्त्वाखाली हा केकेआरचा यंदाच्या सिझनमधील हा दुसरा पराभव होता. दरम्यान या पराभवानंतर आयपीएलच्या पॉईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर झाला आहे.

आयपीएलच्या सुरुवातीच्या काही सामन्यांनंतरच पॉईंट्स टेबलचं चित्र अधिकच मजेदार दिसून येतंय. प्रत्येक मॅचनंतर समीकरणं वेगाने बदलताना दिसतायत. दोन पराभवांचा सामना करूनही केकेआर मात्र पॉईंट्स टेबलच्या तळाशी गेलेली नाही.

सध्या पॉईंट्स टेबलमधील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे तब्बल सहा टीम्सचे गुण समान आहेत. राजस्थान रॉयल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्स आणि सनरायझर्स हैदराबादया सर्व टीम्सच्या खात्यात सध्या प्रत्येकी दोन गुण आहेत. मात्र नेट रन रेटच्या आधारे त्यांच्या क्रमवारीत फरक पडलाय.

पॉईंट्स टेबलमध्ये अग्रस्थानी राजस्थान

सध्या चांगल्या नेट रन रेटमुळे राजस्थान रॉयल्स पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे. त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर दिल्ली कॅपिटलस तिसऱ्या स्थानी आहे. मुंबई इंडियन्स चौथ्या स्थानावर असून पंजाब किंग्स पाचव्या स्थानावर आहे. सनरायझर्स हैदराबाद सहाव्या स्थानावर असून त्यांनी इतरांपेक्षा एक सामना जास्त खेळला आहे.

दुसऱ्या बाजूला काही टीम अजूनही पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत आहेत आहेत. गुजरात टायटन्स, लखनऊ सुपर जायंट्स, कोलकाता नाइट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्स या चार टीम्सना अजून विजयाचं खातं उघडता आलेलं नाही. यामध्ये विशेषतः कोलकात्याच्या टीमवर जास्त दबाव आहे.

चेन्नईची टीम सर्वात तळाला

सध्या पॉईंट्स टेबलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज सर्वात खालच्या स्थानावर आहे. सीएसकेने आतापर्यंत एक सामना खेळला असून त्यात पराभवाचा सामना करावा लागलाय. त्यामुळे स्पर्धेत टिकून राहण्यासाठी त्यांना लवकरच कमबॅक करणं गरजेचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्यात अवकाळी पावसाचा कहर पुण्यासाठी आज आणि उद्या येल्लो अलर्ट

एक्सप्रेसवेवर भयंकर अपघात, सिनिअर काँग्रेस नेते अन् चालकाचा मृत्यू

Summer Tips: उन्हाळ्यात आईस्क्रिम खावे की नाही?

टॅब चोरी केला; 200 अश्लील व्हिडिओ; 1200000 रुपयांची खंडणी, नाशिकमध्ये सेक्स कँडल उघडकीस

Honey Singh And Badshah: 'कलेच्या नावाखाली अश्लीलता चालणार नाही…'; हनी सिंग आणि बादशाहला हायकोर्टाचा कडक इशारा

SCROLL FOR NEXT