Kieron Pollard
Kieron Pollard  Saam TV
क्रीडा | IPL

Kieron Pollard Retires: कायरन पोलार्डची निवृत्तीची घोषणा, मात्र सामन्यांदरम्यान मैदानात दिसणार, MIकडून मोठी जबाबदारी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : इंडियन प्रीमियर लीगची ( IPL) रिटेन्शन लिस्ट बाहेर येण्यापूर्वीच मोठा बातमी समोर आली आहे. मुंबई इंडियन्स टीमचा स्फोटक फलंदाज ऑलराऊंडर कायरन पोलार्डने (Mumbai Indians) निवृत्तीची घोषणा केली आहे.13 वर्षे मुंबई इंडियन्सकडून खेळणारा कायरन पोलार्डने सोशल मीडियावर निवृत्तीची घोषणा करत भावूक झाला.

मात्र पोलार्ड मुंबई इंडियन्ससोबतच राहणार आहे. पोलार्ड पुढील आयपीएल सीजनमध्ये मुंबई संघाचा फलंदाजी प्रशिक्षक म्हणून दिसणार आहे. पोलार्डने निवृत्तीसाठी लिहिलेल्या पोस्टमध्ये त्याने याबाबतची माहिती दिली आहे.

कायरन पोलार्डने म्हटलं की, माझ्यासाठी हा निर्णय सोपा नव्हता, पण मुंबई इंडियन्सशी झालेल्या दीर्घ चर्चेनंतर मी यापुढे आयपीएलमध्ये खेळणार नाही या निष्कर्षापर्यंत पोहोचलो आहे. जर मला मुंबई इंडियन्ससोबत खेळता येत नसेल तर मी कोणत्याही टीमध्ये खेळणार नाही. मात्र हा भावनिक निरोप नाही कारण मी मुंबई इंडियन्सचे फलंदाजी प्रशिक्षकपद स्वीकारले आहे.

पोलार्डने 2010 मध्ये मुंबईसाठी आयपीएलमध्ये पदार्पण केले आणि 2022 पर्यंत संघासाठी खेळत राहिला. त्याने अनेक वेळा संघाचे कर्णधारपदही भूषवले आहे आणि तो संघातील सर्वात दिग्गज खेळाडूंपैकी एक होता. पोलार्डचा मुंबईने उत्कृष्ट फिनिशर म्हणून वापर केला. तसेच गोलंदाजीच्या करत त्याने महत्त्वाच्या प्रसंगी विकेट्सही घेतल्या.

पोलार्डची आयपीएल कारकीर्द

पोलार्डने 189 आयपीएल सामने खेळले, ज्यामध्ये 16 अर्धशतकांसह 3412 धावा केल्या. पोलार्डच्या नावावर आयपीएलमध्ये एकूण 223 षटकार आहेत, तर गोलंदाजीतही त्याच्या नावे एकूण 69 विकेट्स आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : अमरावतीत अनधिकृत होल्डींगवर कारवाई सुरू

Rajasthan Accident: चालकाला लागली डुलकी अन् बस धावत्या ट्रकला धडकली; ७ जणांचा मृत्यू, ८जण जखमी

Serial TRP Ratings : ‘ठरलं तर मग’ आणि ‘प्रेमाची गोष्ट’मध्ये रंगली चुरस, झी मराठीवरील ‘पारू’ला प्रेक्षकांची पसंती

MEA Advisory: नोकरीसाठी जाल अन् गुलामगिरीच्या जाळ्यात अडकाल! कंबोडियाला जाणाऱ्यांसाठी परराष्ट्र मंत्रायलाने जारी केली अ‍ॅडव्हायझरी

Effects of Aelovera: 'या' लोकांनी चेहऱ्यावर कोरफड जेल लावल्यास होतील गंभीर परिणाम

SCROLL FOR NEXT