IPL मधील मुंबई इंडियन्सचा माजी क्रिकेटपटून शिवालिक शर्माला बलात्काराच्या आरोपाखाली जोधपूर पोलिसांनी अटक केली आहे. कुडी भगतसुनी पोलीस ठाण्याने ही कारवाई केली आहे. चार महिन्यांपूर्वी शिवालिक विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याअंतर्गत त्याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी बडोदाहून शिवालिकला पकडून जोधपूरला आणले.
लग्नाचे प्रलोभन दाखवून शिवालिकने माझ्याशी शारीरिक संबंध ठेवले आणि नंतर लग्न करण्यास नकार दिला, असा एका तरुणीने आरोप केला होता. या प्रकरणी पोलिसांनी शिवालिक शर्माला अटक केली आणि न्यायालयासमोर सादर केले. न्यायालयाने शिवालिक शर्माला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
जोधपूरच्या एका तरुणीने जानेवारी २०२५ मध्ये शिवालिक शर्माच्या विरोधात बलात्काराचा खटला दाखल केला होता. पीडित तरुणीने घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. ती म्हणाली, 'फेब्रवारी २०२३ मध्ये बडोद्याला फिरायला गेली होते. तेथे माझी शिवालिकशी भेट झाली. भेटीनंतर आमच्यामध्ये चांगली मैत्री झाली. मैत्रीचे रुपांतर प्रेमामध्ये झाले. आमचे कुटुंबीय एकमेकांना भेटले. शिवालिकचे आई-वडील ऑगस्ट २०२३ मध्ये जोधपूरला आले. आमचा साखरपुडा झाला.'
'साखरपुडा झाल्यानंतर आम्ही अनेकदा एकमेकांना भेटायचो. लग्न होण्यापूर्वीच शिवालिकने माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. ऑगस्ट २०२४ मध्ये शिवालिकच्या कुटुंबियांनी मला बडोद्याला बोलावले आणि ते म्हणाले, शिवालिक क्रिकेटपटू आहे. तुमचा दोघांचा साखरपुडा झाला असला, तरीही लग्न होऊ शकत नाही. शिवालिकच्या लग्नासाठी इतर ठिकाणाहून स्थळं येत आहेत. लग्नाचे आमिष दाखवत त्याने माझा फायदा उचलला, असे म्हणत पीडित तरुणीने पोलिसांसमोर फिर्याद मांडली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.