Rishabh Pant Controversy Video News : लखनौचा कर्णधार ऋषभ पंत वादात अकडला आहे. राजस्थानविरोधातील सामन्यानंतर बोलताना ऋषभ पंतने अश्लील वक्तव्य केल्यामुळे अडचणीत सापडला आहे. आयपीएल सामना तर गमावलाच, त्याशिवाय अफगणिस्तानविरोधातील मालिकेसाठीही पंतला टीम इंडियातून वगळण्यात आले. त्यामुळे ऋषभ पंत वैतागलेला होता का? असा सवाल चाहत्यांकडून उपस्थित केला जात आहे.
मंगळवारी लखनौ आणि राजस्थान यांच्यामध्ये आयपीएलचा रंगतदार सामना झाला. लखनौने प्रथम फलंदाजी करताना २२२ धावांचा डोंगार उभारला. पण प्रत्युत्तरदाखल राजस्थानने हे आव्हान सहज पार केले. आयपीएलमधून आधीच आव्हान संपुष्टात आलेल्या लखनौचा शेवटही खराब होत असल्याचे दिसतेय. लखनौला राजस्थानने पराभव करत आपल्या आशा जिवंत ठेवल्या. पण पंतचा हा हंगामही खराब गेल्याचे दिसतेय. या पराभवानंतर संघाचे कौतुक करताना ऋषभ पंतकडून अपशब्द निघाले अन् वादाला सुरूवात झाली. याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. ऋषभ पंतवर बीसीसीआय कारवाई करणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.
पाहा व्हायरल होणारा व्हिडीओ...
राजस्थानविरोधातील पराभवानंतर कर्णधार ऋषभ पंत नाराज दिसला. त्यामुळेच पंतने सामन्यानंतर थेट टीव्हीवर एक अपशब्द काढला. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
२२० धावा करूनही राजस्थान रॉयल्सकडून पराभव पत्करावा लागला. सामन्यानंतर बोलताना पंत म्हणाला की, मधल्या आणि शेवटच्या षटकांमध्ये जोफ्रा आर्चरची गोलंदाजी खरोखरच चांगली होती. पण या खेळपट्टीवर आणखी पाच ते दहा धावा करू शकलो असते. चांगल्या सुरुवातींतर अधिक धावा करायला हव्या होत्या, पण शेवटच्या षटकांमध्ये फायदा उचलता आला नाही.
संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी या सामन्यात खेळत नव्हता. सामन्यानंतर जेव्हा पंतला त्याच्याबद्दल विचारण्यात आले, तेव्हा तो म्हणाला की, परिस्थिती चांगली असो वा वाईट, अनुभवाची उणीव नेहमीच भासते. अनुभव एका रात्रीत मिळत नाही. तिथे पोहोचायला लोकांना अनेक वर्षे लागतात. हा सामना अपेक्षेप्रमाणे झाला नाही. पण त्यामुळे आम्ही एक खूप चांगला संघ आहोत हे सत्य बदलत नाही. हे सर्व बोलत असतानाच त्याच्या तोंडातून अपशब्द निघाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.