IPL 2023 Saam tv
Sports

IPL 2023: एका षटकात 4 षटकार लगावणाऱ्या खेळाडूच्या सामन्याचे मानधन कापलं, विराट ते वॉर्नरपर्यंत दिग्गजांना बसला फटका

तुफानी फलंदाजी करूनही आयपीएलच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी जेसनचं सामन्याचं मानधन कापलं आहे.

Vishal Gangurde

New Delhi: कोलकाता नाइटराइडर्स संघाचा धडाकेबाज खेळाडू जेसन रॉयने आसीबीच्या विरोधात २६ एप्रिलला झालेल्या सामन्यात तुफान फलंदाजी केली. जेसनने २९ चेंडूत ५० धावा कुटल्या. जेसनने एका षटकात ४ कडकडीत षटकार लगावले. तुफानी फलंदाजी करूनही आयपीएलच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी जेसनचं सामन्याचं मानधन कापलं आहे. (Latest Marathi News)

आयपीएल नियमांतर्गत कारवाई केली जाते, तेव्हा सामन्यादरम्यान क्रिकेटचं एखादं साहित्य, कपडे, मैदानावरील साहित्याचं दुरुपयोग होतो. याआधी आरसीबीच्या विरोधात सामन्यात विजयाची एक धाव केल्यानंतर आवेशने हेल्मेट जमीनीवर आदळलं होतं. त्यावेळी त्याच्यावरही जेसन रॉयसारखी कारवाई करण्यतात आली होती. आयपीएल नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी जेसनवर लेव्हल १ कलम २.२ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

नेमकं काय घडलं?

10व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर विजयकुमार वैशाखने जेसन रॉयला बोल्ड केले. त्यानंतर तंबूत परतताना रॉयने आपला राग दाखवत बॅट हवेत फेकली. त्याच्या वागण्यावर नेटकऱ्यांनीही टीका केली होती.

वॉर्नरवर झाली होती कारवाई

२४ एप्रिलला दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरवर सनराइजर्स हैदराबादच्या विरोधात स्लो ओव्हर रेट अंतर्गत १२ लाख रुपयांचा दंड ठोठावला होता.

विराट कोहलीवरही झाली होती कारवाई

२३ एप्रिलला आयपीएलमध्ये आरसीबीने दुसऱ्यांदा स्लो ओव्हर रेटची चुकी केली होती. यामुळे आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीवर २४ लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. आरसीबीच्या प्लेइंग ११ मध्ये अन्य खेळाडू आणि इम्पॅक्ट सब्सटीट्यूटवर देखील कारवाई करण्यात आली होती. त्यांचं सामन्याचं २५ टक्के मानधन कापलं होतं.

स्लो ओव्हर रेट अंतर्गत कारवाई का होते?

आयपीएलचं लक्ष्य असतं की, प्रत्येक सामना हा ३ तास २० मिनिटात संपला पाहिजे. मात्र, आयपीएलचे अनेक सामने पूर्ण व्हायला ४ तास लागत आहेत.

आयपीएलच्या नियमांतर्गत जर स्लो ओव्हर रेट अंतर्गत पहिल्यांदा कर्णाधारावर कारवाई केली जात असेल तर १२ लाख रुपयांचा दंड ठोठावा लागतो. जर स्लो ओव्हर रेटची चुकी पुन्हा केली तर संपूर्ण संघातील सदस्यांवर कारवाई केली जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Police Death: पोलीस दलात आत्महत्येचं सत्र काही थांबेना! ४ दिवसात ३ आत्महत्या, काय आहे कारण?

Mahalaxmi Vrat 2025 : महालक्ष्मी व्रताची तारीख, पूजा विधी, महत्व घ्या जाणून

Maharashtra Live News Update: ते वक्तव्य करून अजित पवारांकडून मला टॉर्चर करण्याचा प्रयत्न; राम शिंदेंचा आरोप

Gunfire Shooting : क्लबमध्ये अंदाधुंद गोळीबार! तिघांचा जागीच मृत्यू, आठजण जखमी

Astro Tips: सकाळी उठल्यावर आरशात पाहणे शुभ असते की अशुभ?

SCROLL FOR NEXT