RCB VS KKR Match Result: हिशोब बरोबर! मागच्या सामन्यातील पराभवाचा KKR ने घेतला बदला; RCB वर मिळवला जोरदार विजय

RCB vs KKR Highlights: आयपीएल २०२३ स्पर्धेतील ३६ वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला
RCB VS KKR
RCB VS KKRTwitter
Published On

IPL 2023: आयपीएल २०२३ स्पर्धेतील ३६ वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. एम चिन्नास्वामी स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला २१ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे.

या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला २०१ धावांची गरज होती. मात्र रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला अवघ्या १७९ धावा करता आल्या आहेत. या विजयासह कोलकाता नाईट रायडर्स संघाने गुणतालिकेत २ गुणांची कमाई करत मुंबई इंडियन्स संघाची बरोबरी केली आहे.

RCB VS KKR
IPL Points Table: धोनीची CSK ठरणार चॅम्पियन? पाहा IPLच्या Interval नंतर कशी आहे पॉईंट्स टेबलची स्थिती

कोलकाता नाईट रायडर्स संघाने उभारला २०० धावांचा डोंगर..

एम चिन्नास्वामीच्या स्टेडियमवर धावांचा डोंगर उभारला जातो. हे चित्र या सामन्यात देखील पाहायला मिळाले. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या कोलकाता नाईट रायडर्स संघाने २० षटक अखेर २०० धावांचा डोंगर उभारला. या डावात जेसन रॉयने सर्वाधिक ५६ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ४ चौकार आणि ५ षटकार मारले. तर कर्णधार नितीश राणाने अप्रतिम खेळी करत ४८ धावा केल्या. या खेळीदरम्यान त्याने ३ चौकार आणि ४ षटकार मारले. (Latest sports updates)

RCB VS KKR
Arjun Tendulkar Six: नॉर्मल माणूस वाटलोय का? हलक्यात घेणाऱ्या वढेराला Arjun ने दिले जोरदार प्रत्युत्तर - VIDEO

किंग कोहलीची खेळी व्यर्थ ...

या धावांचा पाठलाग करताना कर्णधार विराट कोहलीने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. त्याने ३७ चेंडूंचा सामना करत ५४ धावांची खेळी केली. या खेळी दरम्यान त्याने ६ चौकार मारले. मात्र तो आंद्रे रसलच्या गोलंदाजीवर बाद होऊन माघारी परतला. तर महीपाल लोमरोरने १ चौकार आणि ३ षटकारांच्या साहाय्याने ३४ धावांची खेळी केली. मात्र रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला १७९ धावा करता आल्या.

RCB VS KKR
Rohit Sharma IPL 2023: रोहित शर्मा IPL 2023 मधून माघार घेणार?, माजी खेळाडूने दिला मोलाचा सल्ला

अशी होती दोन्ही संघांची प्लेइंग 11:

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू :

विराट कोहली (कर्णधार), शाहबाज अहमद, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), सुयश प्रभुदेसाई, वानिंदू हसरंगा, डेव्हिड विली, विजयकुमार विशक, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज

कोलकाता नाईट रायडर्स :
एन जगदीसन (विकेटकीपर), जेसन रॉय, व्यंकटेश अय्यर, नितीश राणा (कर्णधार), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, डेव्हिड विसे, वैभव अरोरा, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com