Rajasthan Royals celebrate a crucial win as IPL 2026 points table sees major reshuffle. saam tv
Sports

IPL Points Table: MIचा दरारा गायब, राजस्थानच्या विजयानं पॉईट्स टेबलमध्ये मोठी उलटफेर; कोणत्या संघाला किती मिळाले पॉईट्स?

IPL Points Table: आयपीएल २०२६ च्या पाईंट्स टेबलमध्ये पुन्हा बदल झाला आहे. पंजाब किंग्सचा आपली जागा गमावली असून राजस्थान रॉयल्सने पुन्हा अव्वल स्थान पटकावले आहे. आज सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा सामना गुजरात टायटन्सशी होईल.

Bharat Jadhav

  • राजस्थान रॉयल्स अव्वल स्थानावर पोहोचले

  • मुंबई इंडियन्सचा दबदबा कमी झाला

  • पंजाब किंग्सने स्थान गमावले

आयपीएलच्या सामन्यांमध्ये रंगत वाढू लागली आहे. ज्या संघाचा दबदबा होता, त्यांना सपाटून मार खावा लागत आहे. सर्व संघ एकमेकांना मात देण्यासाठी जोरदार टक्कर देत आहेत. मंगळवारी ७ तारखेला झालेल्या राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्सच्या सामन्यानंतर पॉईंट्स टेबलमध्ये अनेक बदल झाले आहेत. प्रत्येक संघ अव्वल स्थानासाठी स्पर्धा करत आहेत, परंतु दोन असे संघ आहेत, जे अजूनही भोपळ्यात आहेत, म्हणजेच त्यांना अजून विजयाचं खातं उघडता आले नाहीये.

राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामना पावसामुळे कमी ११-११ षटकांचा करण्यात आला. यात राजस्थान रॉयल्सने सामना जिंकला. या विजयासह त्यांनी पॉईंट्स टेबलमध्ये आघाडी घेतली आहे. संघाने आतापर्यंत तीन सामने खेळले असून तिन्ही जिंकले आहेत, त्यामुळे त्यांचे पॉईट्स सहा झाले आहेत. संघाचा नेट रन रेटही जबरदस्त आहे त्यामुळे संघाला फारसा धोका नाहीये.

दरम्यान पंजाब किंग्सने दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. संघाने तीन सामने खेळले असून त्यातील दोन जिंकले आहेत. एक सामना पावसामुळे रद्द झाल्याने पंजाबला फक्त एक गुण मिळाला. दरम्यान आरसीबी आणि दिल्ली कॅपिटल्स यांचे समान गुण आहेत, अनुक्रमे ते तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत.

सनरायझर्स हैदराबाद, एलएसजी आणि मुंबई इंडियन्सला प्रत्येकी दोन पॉईंट आहेत. अनुक्रमे पाचव्या, सहाव्या आणि सातव्या स्थानावर आहेत. आणखी एक सामना जिंकून अव्वल चारमध्ये स्थान मिळवण्याची संधी मुंबईला होती, पण त्यांना त्यात अपयश आले. संघाची आणखी एक समस्या म्हणजे त्यांचा खराब नेट रन रेट. त्यामुळे, दोन पॉईट्स घेणाऱ्या संघांमध्ये मुंबई टेबलच्या तळाशी आहे. केकेआरने एकही सामना जिंकला नाही, पण एक सामना रद्द झाल्याने त्यांनाही एक गुण मिळाला आहे. दरम्यान, गुजरात टायटन्स आणि सीएसके हे दोन संघ शिल्लक आहेत ज्यांचे खाते अद्याप उघडलेले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BJP Candidate List: मोठी बातमी! विधान परिषदेसाठी भाजपकडून ६ उमेदवारांची घोषणा, कुणाकुणाला मिळाली संधी?

पहलगामची हल्ल्याची मुंबईत पुनरावृत्ती, धर्म विचारून केले चाकूचे वार

Batatyache Dhirde Recipe: खमंग आणि चविष्ट नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा बटाट्याचे धिरडे, नोट करा रेसिपी

Maharashtra News Live Update: मंत्री उदय सामंत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी अंतरवाली सराटीत दाखल

महापौर अन् उपमहापौर फिल्डवर; अधिकाऱ्यांची झाडाझडती, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT