IPL Opening Ceremony 2026 saam tv
Sports

IPL 2026 : आयपीएल सुरू होण्याआधीच बीसीसीआयचा मोठा निर्णय; नेमकं घडलं तरी काय?

IPL Opening Ceremony: आयपीएल स्पर्धा सुरू होण्यास अवघे दोन दिवस शिल्लक असतानाच बीसीसीआयनं मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय नेमका कोणता, त्यामागचं कारण काय?

Nandkumar Joshi

आयपीएल स्पर्धा सुरू होण्यास अवघे काही दिवस असताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे. आयपीएल ओपनिंग सेरेमनी होणार नाही, असं बीसीसीआयनं स्पष्ट केलं असून, त्यामागचं कारणही सांगितलं आहे.

आयपीएल स्पर्धा शनिवारी, २८ मार्चपासून सुरू होणार आहे. जगातील सर्वात मोठ्या स्पर्धेला अवघे दोन दिवस असतानाच बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे. यंदा स्पर्धेचं ओपनिंग सेरेमनी होणार नाही.

बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये २८ मार्चला आयपीएलच्या १९ व्या सीझनचा पहिला सामना होणार आहे. सनरायझर्स हैदराबाद (SRH) आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) यांच्यात ही लढत होत आहे. या सामन्याबद्दल क्रिकेट चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. पण स्टेडियममध्ये बसून 'याचि देहि...' जो सोहळा अनुभवण्याची उत्सुकता प्रेक्षकांना असते, तोच उद्घाटन सोहळा यंदा प्रेक्षकांना बघता येणार नाही. हा सोहळा रद्द करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे.

ओपनिंग सेरेमनी रद्द करण्यामागचं कारणही बीसीसीआयनं स्पष्ट केलं आहे. गेल्या वर्षी ४ जून २०२५ रोजी याच स्टेडियमच्या बाहेर प्रचंड गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला होता. आरसीबीच्या विजयी फेरीच्या वेळी गर्दीमुळं अचानक परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आणि चेंगराचेंगरी होऊन काही जणांचा बळी गेला. तर अनेक चाहते जखमी झाले होते.

आयपीएल २०२६ स्पर्धा सुरू होण्याच्या दोन दिवस आधी बीसीसीआयच्या सचिवांची प्रतिक्रिया आली. ओपनिंग सेरेमनी होणार नसल्याच्या वृत्ताला बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया यांनी आजतक संकेतस्थळाला माहिती देताना दुजोरा दिला. यंदा आयपीएलची सुरुवात ओपनिंग सेरेमनीनं होणार नाही. गेल्या वर्षी घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळं हा निर्णय घेतला आहे.

स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर क्लोजिंग सेरेमनी आयोजित केली जाऊ शकते का, याबाबत चर्चा सुरू असल्याचंही ते म्हणाले. तसेच प्रत्येक सामन्याच्या ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित करण्याचा प्रस्ताव आहे. प्रेक्षकांना चांगला अनुभव मिळावा, यासाठीचा हा प्रस्ताव असल्याचंही ते म्हणाले. या प्रस्तावांवर येत्या एक ते दोन दिवसांत अंतिम निर्णय घेतला जाईल, असंही त्यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CM पद मिळावं म्हणून चंद्रकांतदादांनी अशोक खरातकडे केली अघोरी पूजा; काँग्रेस नेत्याच्या आरोपाने खळबळ

Maharashtra Live News Update: अहिल्यानगर जिल्ह्यात सुट्या पेट्रोल-डिझेल विक्रीवर बंदी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Kalyan Accident : तरूण उद्योजकाचा अपघाती मृत्यू; नवी सायकल घेऊन रायडिंगला गेला, भरधाव कारनं उडवलं, CCTV

पुण्यातील भोर हादरलं! जावयाच्या हॉटेलमधील आचाऱ्यानंच केला वृद्धाचा खून, धक्कादायक कारण उघड

Petrol Diesel Rate: राज्यात खासगी पंपांवर पेट्रोल-डिझेल महागलं; आता प्रति लिटर 'इतके' रुपये मोजावे लागणार

SCROLL FOR NEXT