आयपीएल २०२६ च्या ३८ व्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर) आणि लखनौ सुपर जायंट्स (एलएसजी) या संघांमध्ये एक रोमांचक लढत झाली. लखनौच्या एकाना क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेलेला हा सामना सुपर ओव्हरपर्यंत पोहोचला. यात केकेआर संघाने सुपर विजय मिळवला.
केकेआरनं दिलेल्या १५६ आव्हानाचा पाठलाग करताना लखनौ संघाने बरोबरी केली. अखेरच्या विकेटसाठी मैदानात उतरलेल्या मोहम्मद शमीने षटकार लगावत सामना सुपर ओव्हरमध्ये नेला. त्यानंतर केकेआरचा फलंदाजनं रिंकू सिंहनं लखनौला मात दिली.
सुपर ओव्हरमध्ये लखनौने प्रथम फलंदाजी केली. केकेआरकडून सुनील नरेनने गोलंदाजी केली. आपल्या भेदक गोलंदाजीने त्याने अवघ्या ०.३ षटकांत १ धावेत २ बळी घेतले. ऋषभ पंत १ धावेवर नाबाद राहिला. एलएसजीने सुपर ओव्हर १ धाव केली होती आणि २ विकेट गमावल्या होत्या. प्रत्युत्तरात, रिंकू सिंगने प्रिन्स यादवच्या पहिल्याच चेंडूवर चौकार मारून संघाला एक महत्त्वाचा विजय मिळवून दिला.
लखनौ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, पॉवरप्लेमध्ये तीन गडी गमावून कोलकाताची सुरुवात खराब झाली. लखनौकडून मोहसिन खानने शानदार कामगिरी करत ४ षटकांत केवळ २३ धावा देत ५ बळी घेतले. त्याने टीम सायफर्ट, अजिंक्य रहाणे, रोव्हमन पॉवेल, कॅमेरॉन ग्रीन आणि अनुकूल रॉय यांना बाद करून केकेआरला संघाला हादरवून सोडले.
पण केकेआर संघाचा तडाखेबाज फलंदाज रिंकू सिंहने शानदार फलंदाजी केली. त्याने सात चौकार आणि पाच षटकारांसह ५१ चेंडूंमध्ये नाबाद ८३ धावांची शानदार खेळी केली. रिंकूने सुनील नरेनसोबत आठव्या विकेटसाठी २७ चेंडूंमध्ये ५० धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. या खेळीमुळे केकेआरने २० षटकांत ७ गडी गमावून १५५ धावांची सन्मानजनक धावसंख्या उभारली. ही रिंकू सिंहची आतापर्यंतची आयपीएलमधील सर्वोच्च खेळी होती. संघाला सन्मानजनक धावसंख्या मिळवून देणाऱ्या रिंकू सिंहने कोलकाता संघाला सुपर विजय मिळवून दिला.
दरम्यान केकेआरनं दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना लखनौ सुपर जायंट्सनेही १५५ धावा केल्या. कर्णधार ऋषभ पंतने सर्वाधिक ४२ धावा केल्या. एडन मार्करामने ३१ आणि आयुष बडोनीने २४ धावा करून सामना संपवला. मात्र सुनील नरेन आणि वरुण चक्रवर्ती यांनी किफायतशीर गोलंदाजी केली. यामुळे सामन्याचे पारडे केकेआरच्या बाजूने झुकले. पण शेवटच्या षटकात लखनौला विजयासाठी १७ धावांची गरज होती. त्यानंतर सामना शेवटच्या चेंडूवर ७ धावांवर येऊन थांबला,तेव्हा शमीने षटकार मारून सामना बरोबरीत आणला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.