Yuvraj Singh Google
क्रीडा

Yuvraj Singh: 'षटकारांचा बादशाह' युवराज पुन्हा क्रिकेटच्या मैदानात येतोय, मोठी जबाबदारी मिळणार

Bharat Jadhav

टी२० वर्ल्डकप संपताच आयपीएल २०२५ बाबतच्या चर्चाही तीव्र झालीय. कोणत्या खेळाडू कोणत्या संघात जाणार याची चर्चा सुरू झालीय. आता कोचिंग स्टाफच्याही बातम्या येऊ लागल्यात. हाती आलेल्या माहितीनुसार, २०२२ च्या चॅम्पियन गुजरात टायटन्सला नवीन प्रशिक्षक मिळण्याच्या चर्चांनी जोर धरलाय. युवराज सिंगला गुजरात टायटन्सचा प्रशिक्षक बनवलं जाऊ शकतं अशी चर्चा सध्या सुरू झालीय. तर राहुल द्रविड पुन्हा एकदा राजस्थान रॉयल्समध्ये वापसी करू शकतो.

आयपीएलमधून निवृत्ती घेतल्यानंतर युवराज सिंग कोणत्याही संघाशी संबंधित नव्हता, त्यामुळे त्याला गुजरात टायटन्सचे मुख्य प्रशिक्षक बनवणे हा अतिशय आश्चर्यकारक निर्णय ठरेल असं म्हटलं जात आहे. युवराज शेवटचा २०१९ मध्ये आयपीएलमध्ये खेळाडू म्हणून दिसला होता. आयपीएल संदर्भात न्यूज १८ ने दिलेल्या माहितीनुसार, आशिष नेहरा आणि विक्रम सोळंकी गुजरात टायटन्सची सोडणार आहेत. तर युवराज सिंग प्रथमच आयपीएलमध्ये प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. आशिष नेहराच्या जागी युवराज सिंगला गुजरात टायटन्समध्ये मुख्य प्रशिक्षक म्हणून नेमलं जाणार असल्याचं वृत्त नेटवर्क १८ ने दिलंय. त्याला कोचिंग स्टाफमध्ये स्थान मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

याचबरोबर राहुल द्रविड पुन्हा एकदा राजस्थान रॉयल्समध्ये ताफ्यात जाणार जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. राहुल द्रविडचा टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकाचा कार्यकाळ संपलाय. आता तो कोणत्याही आयपीएल संघात सामील होऊ शकतो. कारण आयपीएलमध्ये फक्त 3 महिने काम करावे लागते. इतर अनेक फ्रँचायझीही द्रविडकडे डोळे लावून बसल्या आहेत.

याचबरोबर राहुल द्रविड पुन्हा एकदा राजस्थान रॉयल्समध्ये ताफ्यात जाणार जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. राहुल द्रविडचा टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकाचा कार्यकाळ संपलाय. आता तो कोणत्याही आयपीएल संघात सामील होऊ शकतो. कारण आयपीएलमध्ये फक्त ३ महिने काम करावे लागते.

इतर अनेक फ्रँचायझीही द्रविडकडे डोळे लावून बसल्या आहेत. यादरम्यान आयपीएल संघांचे मालक आणि बीसीसीआय यांच्यात ३० आणि ३१ जुलै रोजी मुंबईत बैठक होणार आहे. यात किती खेळाडूंना कायम ठेवायचे आणि किती खेळाडूंना आरटीएमद्वारे सोडले जाऊ शकते हे ठरवलं जाणार आहे. आयपीएल संघांच्या मालकांची याबाबत दोन भिन्न मते आहेत. काही संघांना 8 खेळाडू कायम ठेवायचे आहेत. युवराज सिंगच्या चर्चांसह आणखी एक मोठी चर्चा सुरू आहे, ही चर्चा आहे गुजरात टायटन्सच्या हिस्सेदारीची. माध्यमांमध्ये सुरू असलेल्या चर्चांनुसार, आयपीएल २०२५ सुरू होण्यापूर्वी अदानी समूह गुजरात टायटन्समधील हिस्सा खरेदी करू शकतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

Friday Horoscope: शुक्रवारी या 5 राशींचे नशीब फळफळणार, देवी लक्ष्मीची होणार कृपा; वाचा राशिभविष्य

SCROLL FOR NEXT