sunrisers hyderabad vs mumbai indians  x (twitter)
Sports

IPL 2025 : हैदराबाद मुंबईविरुद्ध ३०० धावा मारणार; आरसीबीच्या माजी खेळाडूची मोठी भविष्यवाणी, पण 'पलटन' गेम पालटणार?

Sunrisers Hyderabad : सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स या सामन्यात हैदराबादचा विजय झाला. याच दरम्यान एका माजी खेळाडूने केलेल्या भविष्यवाणीमुळे मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना धडकी भरली आहे.

Yash Shirke

IPL 2025 News : सनरायजर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये काल आयपीएल २०२५ मधला दुसरा सामना खेळला गेला. या सामन्यामध्ये हैदराबादच्या फलंदाजांनी धावांचा डोंगर रचला. राजस्थानच्या गोलंदाजांनी त्यांनी अक्षरक्ष: पाणी पाजले. हैदराबादने दुसऱ्यांदा आयपीएलमध्ये सर्वाधिक धावसंख्या करण्याचा विक्रम रचला.

कालच्या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या हैदराबादने २० ओव्हर्समध्ये २८६ धावा केल्या. त्यात सर्वाधिक धावा इशान किशनने १०६ केल्या. ४५ चेंडूंमध्ये त्याने शतक ठोकले. इशान किशनला अभिषेक शर्मा, ट्रेव्हिड हेड, नितीश कुमार रेड्डी, अनिकेत वर्मा यांची साथ देखील लाभली. एका वेळेला धावसंख्या ३०० पार जाणार असे म्हटले जात होते.

याच दरम्यान माजी दक्षिण अफ्रिकन वेगवान गोलंदाज डेल स्टेनने मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना धडकी भरवणारी भविष्यवाणी केली आहे. 'छोटीशी भविष्यवाणी. १७ एप्रिल रोजी आपल्याला आयपीएलमधील पहिले ३०० धावा पाहायला मिळेल. कदाचित ३०० धावा होत असताना मी प्रत्यक्ष तेथे उपस्थित असेनही', अशी एक्स पोस्ट डेल स्टेनने केली आहे.

१७ एप्रिल रोजी सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स अशी लढत पाहायला मिळणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. त्यामुळे हैदराबादचा संघ मुंबईच्या विरोधात ३०० धावा करेल असे संकेत डेल स्टेनने दिले आहेत. डेल स्टेनची ही भविष्यवाणी खरी ठरते की नाही हे आपल्याला १७ एप्रिल रोजी पाहायला मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandurbar : चांदसैली घाटात दरड कोसळली; थोडक्यात दुर्घटना टळली

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यातील तीनशे घरात शिरलं पाणी

Heart blockage symptoms:हार्ट ब्लॉकेज झाल्यावर शरीरात दिसतात ६ मोठे बदल; तुम्हालाही त्रास होत असेल तर सावध व्हा

Poco M7 Plus 5G: पोकोने लाँच केला नवीन स्मार्टफोन; ७०००mAh बॅटरी आणि दमदार फिचर्स, जाणून घ्या किंमत

Coolie vs War 2: रजनीकांतच्या 'कुली' आणि हृतिक रोशनच्या 'वॉर २'मध्ये चढोओढ; तिसऱ्या दिवशी कोणी केली जास्त कमाई

SCROLL FOR NEXT