RCB saam tv
Sports

RCB Captain: RCB चा कर्णधार ठरला! विराट नव्हे, तर या खेळाडूकडे सोपवली जबाबदारी

Rajat Patidar, New Captain Of RCB: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने आपल्या नव्या कर्णधाराची घोषणा केली आहे. कोणाला मिळाली ही जबाबदारी ? जाणून घ्या.

Ankush Dhavre

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धा झाल्यानंतर जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट लीग स्पर्धेला सुरुवात होणार आहे. आयपीएल २०२५ स्पर्धेला येत्या २१ मार्चपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेपूर्वी सर्वात मोठा प्रश्न असा होता की, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचं नेतृत्व कोण करणार? विराट कोहलीने कर्णधारपदावरून माघार घेतल्यानंतर ही जबाबदारी फाफ डू प्लेसिसकडे सोपवण्यात आली.

आता या स्पर्धेसाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने नव्या कर्णधाराची घोषणा केली आहे. भारताचा स्टार फलंदाज रजत पाटीदार या संघाचं नेतृत्व करताना दिसणार आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला नवा कर्णधार मिळणार असल्याची घोषणा याआधीच करण्यात आली होती. गुरुवारी या संघाच्या टीम मॅनेजमेंटने पत्रकार परिषद घेत आपल्या नव्या कर्णधाराची घोषण केली आहे. या पत्रकार परिषदेत संघाचे मेंटॉर आणि प्रशिक्षक उपस्थित होते.

कसा राहिलाय रजत पाटीदारचा रेकॉर्ड?

रजत पाटीदार आपल्या शानदार फलंदाजीसाठी ओळखला जातो. गेल्या हंगामात त्याने आक्रमक फलंदाजीने जोरदार हवा केली होती. त्याची ही फलंदाजी पाहता, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने त्याला रिटेन करण्याचा निर्णय घेतला होता.

रजत पाटीदारच्या नेतृत्वाबद्दल बोलायचं झालं तर, त्याला सैय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत मध्यप्रदेश संघाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली होती. ही जबाबदारी त्याने योग्यरित्या पार पाडली. त्याला १४ सामन्यांमध्ये संघाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली. या पैकी ११ सामने जिंकले. तर ३ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाच्या आतापर्यंतच्या सर्व कर्णधारांची यादी

ज्यावेळी हा संघ पहिला हंगाम खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. त्यावेळी राहुल द्रविड या संघाचं नेतृत्व करताना दिसून आला होता.त्यानंतर अनिल कुंबळे, केविन पीटरसन, शेन वॉटसन, डॅनियल विटोरी, विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिसला या संघाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली. आता रजत पाटीदार या संघाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. या संघाने आतापर्यंत फायनल गाठली आहे. मात्र एकदाही या संघाला आयपीएलची ट्रॉफी जिंकता आलेली नाही.

आयपीएल २०२५ स्पर्धेसाठी असा आहे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ:

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोल्हापूर जिल्ह्यातील धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस

Saturday Horoscope : कष्टाचं फळ मिळणार, यश खेचून आणाल; ५ राशींच्या लोकांचे स्वप्न सत्यात उतरेल

Mobile Recharge: सरकार भरणार मोबाईलचं बिल? केंद्र सरकारची मोफत रिचार्ज योजना?

हनी ट्रॅपची इनसाईड स्टोरी, हनी ट्रॅपसाठी महिलेने कसा रचला सापळा?

Kolhapur News: 'महादेवी'साठी ग्रामस्थ आक्रमक, वनतारामध्ये 'महादेवी'ला नेण्यास विरोध

SCROLL FOR NEXT