PBKS IPL 2025 x
Sports

IPL 2025 : पंजाब किंग्सला बसला मोठा धक्का, तेजतर्रार गोलंंदाजाने अर्ध्यातच आयपीएल सोडली, कारण...

PBKS IPL 2025 : पंजाब किंग्सच्या संघातील वेगवान गोलंदाजाने आयपीएल २०२५ मधून माघार घेतली आहे. या खेळाडूच्या जाण्याने पंजाबचे मोठे नुकसान होणार असल्याचे म्हटले जात आहे. कोण आहे हा खेळाडू? जाणून घ्या..

Yash Shirke

सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्स या हायव्होल्टेज सामन्यामध्ये हैदराबादच्या फलंदाजांनी दमदार खेळ करत पंजाबवर मात केली. या सामन्यात अभिषेक शर्माने सर्वाधिक १४१ धावा केल्या. २५५ च्या स्ट्राईक रेटने खेळताना त्याने १४ चौकार आणि १० षटकार मारले. लखनऊच्या फलंदाजांनी पंजाबच्या गोलंदाजांची धुलाई केली.

हैदराबाद विरुद्धच्या सामन्यामध्ये गोलंदाजी करताना दोन बॉल टाकल्यानंतर लॉकी फर्ग्युसन लंगडत मैदानाबाहेर गेला होता. डाव्या मांडीला धरुन मैदानाबाहेर पडल्याचे पाहायला मिळाले. दुखापत झाल्याने त्याने सामना सोडून जाण्याचा निर्णय घेतला होता. लॉकी फर्ग्युसनच्या अनुपस्थितीमुळे पंजाबचे मोठे नुकसान झाले. फॉर्ममध्ये असलेला वेगवान गोलंदाज खेळत नसल्याने पंजाबचा पराभव झाला असेही काहीजण म्हणत होते.

दुखापतग्रस्त लॉकी फर्ग्युसनने आयपीएल २०२५ मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाब किंग्सचे प्रमुख प्रशिक्षक जेम्स होप्स यांनी या संबंधित माहिती दिली. लॉकी फर्ग्युसन अनिश्चित काळासाठी स्पर्धेतून बाहेर पडला आहे. स्पर्धेच्या अखेरीस त्याचे परतणे अशक्य आहे. लॉकी फर्ग्युसन गंभीररित्या दुखापतग्रस्त झाला आहे असे वक्तव्य जेम्स होप्स यांनी केले आहे.

पंजाब किंग्ससाठी लॉकी फर्ग्युसन हा महत्त्वपूर्ण खेळाडू होता. चार सामन्यांमध्ये त्याने एकूण महत्त्वाच्या ५ विकेटस् घेतल्या आहे. मध्यल्या ओव्हर्समध्ये लॉकी फर्ग्युसन गोलंदाजी करत असे. ओव्हर्समध्ये कमी धावा देत असल्याने तो पंजाबसाठी खास बनला होता. आयपीएल २०२५ सोडण्याच्या त्याच्या निर्णयामुळे पंजाबचे नुकसान झाले आहे. आता १५ एप्रिल म्हणजेच उद्याच्या सामन्यात त्याच्या जागी कुणाला खेळण्याची संधी मिळेल असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care Tips: पावसाळ्यात ग्लोइंग त्वचा हवीये, मग फॉलो करा 'या' सिंपल टिप्स

Shubman Gill : शुभमन गिलकडून झाली मोठी चूक! भारताच्या कॅप्टनचा 'तो' व्हिडीओ लीक, बीसीसीआयला फटका बसणार?

Maharashtra Live News Update : विठू नामाच्या जयघोषात धाकटी पंढरी दुमदुमली

Laxman Hake News : अजित पवारांची माफी मागावी अन्यथा...; लक्ष्मण हाके यांना कायदेशीर नोटीस, अडचणी वाढणार

Shraddha kapoor: श्रद्धा कपूरचा ऑफ-शोल्डर ग्लॅमरस लूक पाहिलात का?

SCROLL FOR NEXT