Sports

IPL 2025 Points Table: गुणतालिकेत मोठी उलटफेर; लखनौचा धुव्वा उडवल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सची Points Tableमध्ये भरारी

IPL 2025 Points Table: आयपीएलमध्ये चार संघांचे आता प्रत्येकी दोन गुण आहेत. तर यात असे सहा संघ आहेत ज्यांच्या नावावर एक ही पॉइंट नाहीये. आज मंगळवारी गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्सच्या दरम्यान अहमदबाद येथे सामना होणार आहे.

Bharat Jadhav

IPL 2025 मध्ये आतापर्यंत एकूण चार सामने झाले आहेत. आता गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स हे दोनच संघ शिल्लक आहेत. ज्यांनी अद्याप एकही सामना खेळलेला नाहीये. या दोन संघांमध्ये होणारा सामना हा पाचवा असेल. या दोन्ही संघाची लढत आज मंगळवारी अहमदाबादच्या ऐतिहासिक मैदानावर सामना होणार आहे. आत्तापर्यंत पॉइंट टेबल पाहिला तर त्यात खूपच मनोरंजक दिसत आहे.

सनरायझर्स हैदराबाद संघ गुणतालिकेत अव्वल

आयपीएल 2025 च्या पॉइंट टेबलमध्ये सध्या सनरायझर्स हैदराबाद, आरसीबी, चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे चार संघ वरती आहेत. या संघांनी त्यांचे प्रत्येक सामने जिंकले आहेत. पॉइंट टेबलमध्ये सनरायझर्स हैदराबाद संघ पहिल्या क्रमांकावर कायम आहे. त्याचा निव्वळ रन रेट खूप जास्त आहे, त्यामुळे हा इतर संघांच्या पुढे आहे.

SRH चा निव्वळ रन रेट सध्या अधिक 2.200 आहे, त्यामुळे संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर कायम आहे. यानंतर आरसीबी दुसऱ्या क्रमांकावर आहे. बेंगळुरूचा नेट रन रेट सध्या प्लस 2.137 आहे. चेन्नई सुपरकिग्सचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. संघाचा निव्वळ रन रेट प्लस 0.493 आहे. लखनौला पराभूत केल्यानंतर दिल्ली कॅपिटल्स संघ चौथ्या क्रमांकावर गेलाय. संघाचा नेट रन रेट प्लस 0.371 आहे.

पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्सचा सामना

लखनौ सुपर जायंट्स, मुंबई इंडियन्स, केकेआर आणि राजस्थान रॉयल्स या संघांना पराभवाचा सामना करावा लागलाय. त्यामुळे त्यांच्या खात्यात एकहीही पॉइंट्स नाहीत. या संघाचा नेट रन रेटही उणे आहे. पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील पहिला सामना आज 25 मार्च रोजी होणार आहे. हा सामना जिंकणारा संघाला पॉइंट मिळेल. तर पराभूत संघाला पहिल्या गुणासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ड्रम निळ्या रंगाचाच का असतो?

Lip Care: हायड्रेशनच्या कमीमुळे ओठ काळे पडले आहे का? मग करा 'हे' घरगुती उपाय

Raju Shetti : पंढरपुरात शक्तीपीठ महामार्ग विरोधी दिंडी; राजू शेट्टी यांचे आंदोलन, पांडुरंगाला घातले साकडे

Maharashtra Live News Update: बोरिवली पूर्वेतील एसआरए प्रकल्पात भीषण आग

Dhiraj Deshmukh: माजी मुख्यमंत्र्यांच्या धाकट्या मुलाचं शिक्षण किती?

SCROLL FOR NEXT