IPL 2024 Playoffs Schedule final ticket prize and prize booking process amd2000 twitter
Sports

IPL Opening Ceremony: आयपीएलची ओपनिंग केव्हा, कुठे अन् कधी होणार? तिकीटाची किंमत किती?

IPL Opening Ceremony Update: आयपीएल २०२५ स्पर्धेला येत्या २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. दरम्यान या स्पर्धेचा ओपनिंग सोहळा केव्हा पार पडणार? जाणून घ्या.

Ankush Dhavre

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचा थरार समाप्त झाला असून लवकरच आयपीएल २०२५ स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ आमनेसामने येणार आहे.

या हाय व्हॉल्टेज सामन्यापूर्वी भव्य दिव्य असा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. दरम्यान या स्पर्धेची ओपनिंग सेरेमनी केव्हा, कुठे आणि कधी होणार? जाणून घ्या.

गेल्या हंगामात श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळताना कोलकाता नाईट रायडर्स संघाने जेतेपदाची ट्रॉफी उंचावली होती. त्यामुळे या हंगामात या संघाला स्पर्धेतील पहिला सामना खेळण्याची संधी मिळाली. २२ मार्चला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि कोलकाता नाईट रायडर्स हे दोन्ही संघ आमनेसामने येतील.

या सामन्याला संध्याकाळी ७:३० वाजता सुरुवात होईल. तर टॉस ७ वाजता होईल. गेल्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाची जबाबदारी फाफ डू प्लेसिसकडे होती. तर यावेळी ही जबाबदारी रजत पाटीदारकडे सोपवण्यात आली आहे. तर कोलकाता नाईट रायडर्सची जबाबदारी अजिंक्य रहाणेकडे सोपवण्यात आली आहे.

कुठे होणार ओपनिंग सेरेमनी?

आयपीएल २०२५ स्पर्धेपूर्वी होणारी ओपनिंग सेरेमनी कोलकात्यातील इडन गार्डन्सच्या मैदानावर रंगणार आहे.

किती वाजता सुरु होणार?

आयपीएल २०२५ स्पर्धेतील पहिला सामना २२ मार्चला होणार आहे. पहिल्या सामन्याला ७ वाजता सुरुवात होईल. तर ६ वाजता ओपनिंग सेरेमनीला सुरुवात होईल.

स्टार अभिनेते लावणार हजेरी

या ओपनिंग सोहळ्यासाठी बॉलिवूडचे स्टार अभिनेते हजेरी लावू शकतात. मात्र कोण कोण येणार आहे,याबाबत कुठलीही अपडेट समोर आलेली नाही.

या स्पर्धेतील ओपनिंग सेरेमनी पाहण्यासाठी तुम्हाला वेगळं तिकीट घेण्याची गरज नाही. तुम्ही कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचे तिकीट खरेदी करुन ओपनिंग करुन तुम्ही ओपनिंग सोहळा पाहू शकता. माध्यमातील वृत्तानुसार, या सामन्यासाठीचं तिकीट ३५०० इतकं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर फोडाफोडीला सुरुवात? शिंदे गटानंतर ठाकरेंचे ११ नगरसेवक अज्ञातस्थळी

Horoscope Monday: रागावर ठेवा नियंत्रण, 5 राशींना मिळणार नवीन संधी, पैसाही टिकेल; वाचा सोमवारचे राशीभविष्य

Kolhapur Politics: कोल्हापुरात शरद पवार गटाला मोठा धक्का; बडा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: जिल्हा परिषदांच्या निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची रणनीती ठरली, दोन्ही राष्ट्रवादी येणार एकत्र

Guhagar Tourism : ओ नाखवा बोटीनं फिरवाल का...; गुहागरमधील 'हा' बीच परदेशी पर्यटकांनाही खुणावतो

SCROLL FOR NEXT