Jasprit Bumrah Mumbai Indians 
Sports

Jasprit Bumrah : मी तर चाल्लोय... महत्त्वाच्या सामन्यापूर्वी जसप्रीत बुमराहचं धक्कादायक वक्तव्य, चाहत्यांचं टेन्शन वाढलं

Mumbai Indians चा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. जसप्रीत बुमराह व्हिडीओमध्ये नेमकं काय म्हणाला? जाणून घ्या...

Yash Shirke

IPL 2025 च्या एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सचा पराभव केला. आता मुंबईचा संघ क्वालिफायर २ मध्ये पंजाब किंग्सला भिडणार आहे. मुंबई विरुद्ध पंजाब क्वालिफायर २ सामन्यामध्ये जो संघ जिंकेल, तो फायनलमध्ये जागा मिळवेल. आयपीएलची धामधुम सुरु असताना मुंबई इंडियन्सचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या एका व्हिडीओने नेटकऱ्याचे लक्ष वेधले आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये जसप्रीत बुमराहने मुंबईचा संघ अहमदाबादमध्ये फायनल खेळेल असा विश्वास व्यक्त केला आहे. 'मुंबईच्या संघाला अहमदाबादला (फायनल खेळण्यासाठी) घेऊन जाण्यासाठी माझे सर्वोत्तम प्रयत्न करत आहे. मी नक्की अहमदाबादला जाणार आहे', असे जसप्रीत बुमराह व्हिडीओमध्ये म्हणतो. मुंबई इंडियन्स फायनलमध्ये जाईल याची खात्री करु नका असे आश्वासन बुमराहने दिले आहे.

मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स हा एलिमिनेटर सामना मुल्लानपूर येथे रंगला होता. मुंबईकडून रोहित शर्माने सर्वाधिक ८१ धावा केल्या. मुंबईने दिलेले २२९ धावांचे लक्ष्य गाठताना गुजरातने २०८ धावा केल्या. शुभमन गिल आणि कुसल मेंडिस बाद झाल्यानंतर साई सुदर्शन आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी दमदार भागीदारी केली होती. जसप्रीत बुमराहने वॉशिंग्टन सुंदरला बाद करत ही भागीदारी मोडीत काढली. हा क्षण मुंबईसाठी टर्निंग पॉईंट ठरला.

कर्णधार हार्दिक पंड्याने जसप्रीत बुमराहचे कौतुक केले. जेव्हा तुम्हाला वाटेल की, सामना हातातून दूर जात आहे. तेव्हा बुमराहला गोलंदाजीला बोलवायचं, हे इतकं सोप्प आहे, असे पंड्याने म्हटले. मुंबईच्या विजयात जसप्रीत बुमराहचे योगदान मोठे असल्याचेही मुंबईच्या कर्णधाराने केले. त्याशिवाय बुमराहच्या गोलंदाजीची तुलना हार्दिकने मुंबईतील घरांच्या किंमतींशी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Archery World Championships: सुवर्ण कामगिरी; भारताच्या तिरंदाजांनी इतिहास रचला

Nagpur: दारूबंदी असतानाही विक्री; एकाला अवैध दारूसाठ्यासह अटक

दहिसरमध्ये भीषण आग, अग्निशमन दल घटनास्थळी, पाहा व्हिडिओ

Instant Face Pack: अर्ध्या तासात येईल चेहऱ्यावर ग्लो, वापरा हा घरात तयार केलेला फेसपॅक

SBI Clerk 2025 : SBI बँकेत नोकरीची सुवर्णसंधी! क्लर्क पदासाठी मोठी भरती, ६५८९ रिक्त जागा

SCROLL FOR NEXT