Mumbai Indians Hardik Pandya X
Sports

Mumbai Indians : हार्दिक पंड्याची एक चूक संघाला भोवणार, मुंबई प्ले-ऑफच्या बाहेर जाणार?

Mumbai Indians Hardik Pandya : आयपीएल २०२५ आता रंजक वळणावर आले आहे. पॉईंट्स टेबलवर चढाओढ सुरु आहे. गुजरात विरुद्धचा सामना गमावल्याने मुंबई इंडियन्सचे मोठे नुकसान झाले आहे.

Yash Shirke

IPL 2025 मधला ५६ वा सामना काल वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. अटीतटीच्या सामन्यात शेवटच्या चेंडूवर गुजरात टायटन्सचा विजय झाला. तर ६ विजयानंतर मुंबई इंडियन्सला पराभवाचा सामना करावा लागला. कर्णधार हार्दिक पंड्याने केलेल्या चुकांमुळे मुंबईचा पराभव झाला आणि पॉईंट्स टेबलवर मुंबई चौथ्या स्थानी पोहोचली.

मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामन्यामध्ये पावसाची एन्ट्री झाली होती. सुरुवातीला मुंबईच्या संघाने फलंदाजी करताना १५५ धावा केल्या. १५६ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी गुजरातच्या शिलेदारांनी शर्थीचे प्रयत्न केले. डाव सुरु असताना पाऊस पडायला लागला. गुजरातला १९ ओव्हर्समध्ये १४७ धावांचे नवे आव्हान देण्यात आले.

पावसानंतर डावाला पुन्हा सुरुवात झाली, त्यावेळेस गुजरातची धावसंख्या १७ व्या ओव्हरपर्यंत १३२/६ अशी होती. राहुल तेवतिया आणि जेराल्ड कोएत्झी फलंदाजी करत होते. अठराव्या ओव्हरमध्ये दीपक चहर फलंदाजी करण्यासाठी आला. पहिल्या ३ चेंडूवर ११ धावा गुजरातच्या फलंदाजांनी काढल्या. पुढे पाचव्या चेंडूवर जेराल्ड कोएत्झीची विकेट पडली.

शेवटच्या चेंडूवर गुजरातला विजयासाठी एक धाव हवी होती. तेव्हा अर्शद खान स्ट्राईकवर होता. त्याने चेंडूवर शॉट मारला, चेंडू थेट हार्दिक पंड्याकडे गेला. त्याने जोरदार थ्रो केला पण चेंडू स्टंपवर लागला नाही, स्टंपिंग मिस झाल्याने अर्शद खान वाचला. अर्शद खान आणि राहुल तेवतिया यांनी एक धाव पूर्ण केली आणि गुजरातने सामना जिंकला.

हार्दिकने जर अर्शदला रनआउट केले असते, तर मुंबईने सामना गमावला नसता. हार्दिकने शेवटची ओव्हर दीपक चहराला दिल्याने आणि शेवटच्या चेंडूवर नीट थ्रो करुन रनआउट न केल्याने मुंबईचा पराभव झाला असे अनेकजण म्हणत आहेत. कालच्या पराभवामुळे मुंबईच्या नेटरनरेटवर परिणाम झाला. मुंबईने पॉईंट्स टेबलवरचे आपले स्थान गमावले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bareli Protest : बरेलीत नमाजावेळी मोठा गोंधळ, शेकडो आंदोलक रत्यावर उतरले; पोलिसांचा लाठीचार्ज

Vastu Tips Of Lighting Diya: घरात या दिशेला ठेवू नये पेटता दिवा, ओढवेल मोठं संकट

Washim Accident: वाशिममध्ये भीषण अपघात! १३ चिमुकल्यांना घेऊन जाणारी व्हॅन खड्ड्यात पलटली अन् पुढे...

katrina kaif: कतरिना कैफपूर्वी ‘या’ अभिनेत्रींनी चाळीशीत घेतलेला आई होण्याचा निर्णय

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये आदिवासींची महापंचायत

SCROLL FOR NEXT