MI Vs PBKS Qualifier 2 Match  x
Sports

MI Vs PBKS : मुंबईच्या चाहत्यांसाठी खुशखबर! पाऊस थांबल्याने सामन्याला सुरुवात, पण किती ओव्हर्सचा खेळ होणार? वाचा

MI Vs PBKS Qualifier 2 Match : पावसामुळे मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स हा सामना काही काळासाठी थांबवण्यात आला होता. आता पाऊस थांबल्याने सामन्याला पुन्हा सुरुवात होणार आहे.

Yash Shirke

IPL 2025 मधील क्वालिफायर २ हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. हा सामना ७.३० ला सुरु होणार होता, पण तेव्हा पावसाची एन्ट्री झाली. ७.३० ते ८.४५ या दरम्यान पाऊस ये-जा करत होता. आता सुदैवाने पाऊस थांबला आहे. पाऊस थांबल्यानंतर पिचवरील कव्हर्स काढण्यात आले. सामन्यात ९.४५ वाजता सुरुवात होणार असून संपूर्ण ४० ओव्हर्सचा (म्हणजेच दोन्ही इनिंग २० ओव्हर्स) खेळ होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स या क्वालिफायर २ सामन्यामध्ये पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरने टॉस जिंकला. त्याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण त्यानंतर पंजाबचे ११ शिलेदार आणि मुंबईचे दोन सलामीवीर मैदानात उतरण्याच्या बेतात होते. तेव्हा अचानक पावसाने एन्ट्री मारली. दीड-दोन तास पाऊस पडला.

मुंबई विरुद्ध पंजाब सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी पाऊस पडायला लागला. सामना ७.३० ला सुरु होणार इतक्यात पाऊस सुरु झाला. पिच खराब होऊ नये यासाठी पिच कव्हर्सने झाकण्यात आली. ८.०५ वाजता कव्हर्स काढले गेले. लगेच पाऊस सुरु झाल्याने ८.१५ वाजता पिच झाकली गेली. पावसाचा जोर कमी झाल्याने ८.४० ला कव्हर्स काढण्यात आले. लगेच ८.४३ ला पाऊस सुरु झाला. त्यानंतर पाऊस थांबल्याने ९.४५ वाजता सामन्याची सुरुवात झाली.

मुंबई इंडियन्सचे प्लेईंग ११ -

रोहित शर्मा, जॉनी बेअरस्टो, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, मिचेल सँटनर, राज बावा, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, रिस टोप्ली

(इम्पॅक्टचे पर्याय - अश्वनी कुमार, कृष्णन श्रीजीथ, रघु शर्मा, रॉबिन मिन्झ, बेव्हॉन जेकब्स)

पंजाब किंग्सचे प्लेईंग ११ -

प्रियांश आर्य, जोश इंग्लिस, श्रेयस अय्यर (कर्णधार), नेहल वढेरा, मार्कस स्टॉयनिस, शशांक सिंग, अजमातुल्ला ओमरझाई, काइल जेमिसन, विजयकुमार वैशाख, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल

(इम्पॅक्टचे पर्याय - प्रभसिमरन सिंग, प्रवीण दुबे, सूर्यांश शेडगे, झेवियर बार्टलेट, हरप्रीत ब्रार)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गणपती विसर्जनाच्या बंदोबस्तानंतर ASI अधिकाऱ्याचा मृत्यू; महाराष्ट्र पोलिस दलात शोककळा

Maharashtra News Live Update: शिवाजी पार्कमधील काँग्रेस आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली

Black Raisins Benefits: दिवसाची सुरुवात करा भिजवलेले काळे मनुके खाण्याने, शरिराला मिळतील हे ७ आरोग्यदायी फायदे

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, आज खात्यामध्ये ₹1500 जमा होणार; लगेच मेसेज चेक करा

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! ₹72 हजार किमान बेसिक पगाराचा प्रस्ताव, फिटमेंट फॅक्टर 4 चर्चेत

SCROLL FOR NEXT