Mumbai Indians saam tv
Sports

Mumbai Indians : कोलकाताविरुद्ध जिकायचंय? तर मुंबई इंडियन्सला या 5 सुधारणा करण्याची गरज...

Mumbai Indians : मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स हा सामना वानखेडेवर खेळला जाणार आहे. या सामन्यात केकेआरवर विजय मिळवायचा असल्यास मुंबईला त्यांच्या संघात कोणत्या सुधारणा कराव्या लागणार आहेत? वाचा

Yash Shirke

Mumbai Indians : मुंबई इंडियन्सने आपला पहिला सामना चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध खेळला होता, ज्यामध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यातही मुंबईला मोठ्या फरकाने पराभव पत्करावा लागला. त्यामुळे आयपीएल २०२५ मध्ये पहिला विजय मिळवण्यासाठी मुंबईचा संघ संपूर्ण ताकदीने लढत देईल. आज मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात रोमांचक सामना होणार आहे. हा सामना जिंकायचा असेल तर मुंबईला या ५ गोष्टी सुधाराव्या लागतील.

१. मुंबई इंडियन्सचे दोन्ही सलामीवीर रोहित शर्मा आणि रायन रिकेल्टन दोन्ही सामन्यांमध्ये फेल झाले आहेत. रोहित एकदा शून्यावर तर दुसऱ्यांदा ८ धावा करुन बाद झाला होता. रायन रिकेल्टन देखील दोन्ही सामन्यांत कमी धावा करुन माघारी परतला होता. सलामीवीरांनी चांगली सुरुवात करवून देण्याची गरज आहे.

२. ट्रेंट बोल्ट आणि दीपक चहर असे दोन टॉपचे वेगवान गोलंदाज मुंबईच्या ताफ्यात आहेत. तरीही दोन्ही सामन्यांमध्ये मुंबईला पॉवर प्लेमध्ये लवकर मिळत नसल्याने प्रतिस्पर्धी संघाला फायदा होत आहे. याशिवाय दोन्ही गोलंदाज अधिक धावा देत असल्याने मुंबई इंडियन्स बॅकफूटवर जात आहे.

३. पॉवर प्लेनंतर ७ ते १५ ओव्हरपर्यंत चौकार-षटकार मारण्यासोबत स्ट्राइक रोटेट करणे देखील गरजेचे असते. त्यामुळे गोलंदाजांवर दबाव येतो. मुंबईच्या मधल्या फळीतील फलंदाज स्ट्राइक रोटेट करत नसल्याने प्रतिस्पर्धी संघाला कमी अडचणी येत आहेत. शिवाय शॉट मारण्याच्या नादात फलंदाज बाद होत आहेत.

४. मुंबई इंडियन्सची प्लेईंग ११ अजूनही सेट झालेली नाही. पहिल्या सामन्यात चांगली कामगिरी करणाऱ्या विग्नेशला दुसऱ्या सामन्यात डच्चू देण्यात आला. रॉबिन मिन्ज आणि सत्यनारायण राजू यांना चांगला खेळ करता आलेला नाही. त्यामुळे प्लेईंग ११ सेट झाल्यावर मुंबईचा विजय होईल असे म्हटले जात आहे.

५. सलामीवीर फलंदाज लवकर बाद होत असल्याने मध्यम फळीतल्या फलंदाजांवर त्यातही तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव यांच्यावर दबाव येत असल्याचे दिसते. त्यामुळे त्यांना मनाप्रमाणे खेळता येत नाही असे वाटते. शिवाय ते दोघेही सेट होऊन लगेच माघारी फिरतात. तेव्हा मध्यम फळी टिकून राहिली तर मुंबई इंडियन्स नक्की विजयी होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एकाच रुळावर समोरासमोर आल्या दोन लोकल, चर्नी रोड स्थानकाजवळील घटना

Maharashtra News Live Update: सैराट फेम आरबाज शेख याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्फत 1 लाख रुपयाचा चेक देऊन करण्यात आली मदत

बाबोss...पेन्शनचे ११०० रुपये काढायला बँकेत गेल्या, अकाउंटमध्ये ७४० कोटी; ४४० व्होल्टचा झटकाच बसला, रात्रभर झोप न लागल्यानं तब्येत बिघडली

Palghar Tourism : पाऊस, हिरवेगार जंगल , धबधबा अन् ट्रेक; वन डे ट्रिपसाठी बेस्ट आहे पालघरजवळील 'हे' लोकेशन

Skin Care: फक्त 20 मिनिटांत मिळवा सॉफ्ट आणि ग्लोईंग स्किन; घरी तयार केलेला हा फेसपॅक नक्की वापरून पाहा

SCROLL FOR NEXT