Rohit sharma MI VS CSK Saam Tv
Sports

MI VS CSK Live IPL 2025 : रोहितचा चल रे भोपळ्या टुणूक टुणूक.. पहिल्याच सामन्यात हिटमॅन फेल, Video व्हायरल

Rohit Sharma : मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स हा महामुकाबला सुरु आहे. या सामन्यामध्ये रोहित शर्मा शून्य धावांवर बाद झाला आहे. यासोबत सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होण्याचा विक्रम रोहितने केला आहे.

Yash Shirke

Rohit Sharma : रोहित शर्मा मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स महामुकाबल्यात शून्यावर बाद झाला आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये रोहित भोपळाही न फोडता माघारी परतला. यामुळे हिटमॅनच्या नावावर नकोशा रेकॉर्डची नोंद झाली आहे. रोहित शर्मा आयपीएलच्या इतिहासात तब्बल १४ वेळा शून्यावर बाद झाला आहे.

टॉस जिंकत चेन्नईने गोलंदाजी घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर रोहित शर्मा आणि रियान रिकल्टन हे मुंबईचे सलामीवीर फलंदाजीसाठी तयार झाले. सामन्याच्या पहिल्या ओव्हरमध्ये रोहित शर्मा बाद झाला. खलील अहमदने टाकलेल्या बॉलवर हिटमॅनने शॉट मारला. शिवम दुबेने चपळाईने रोहितचा कॅच घेत त्याला बाद केले. यादरम्यानचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक वेळा शून्यावर बाद झालेले खेळाडू

१८ - रोहित शर्मा

१८ - दिनेश कार्तिक

१७ - ग्लेन मॅक्सवेल

१६ - सुनील नरेन

१६ - पियुष चावला

रोहित शर्मा बाद झाल्यानंतर रियान रिकल्टनने दुसऱ्या ओव्हरमध्ये बोल्डआऊट झाला. त्यालाही खलील अहमदने बाद केले. पुढे चौथ्या ओव्हरमध्ये फटकेबाजी करणारा विल जॅक्स कॅचआउट झाला. पावरप्ले संपल्यानंतर सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा मोर्चा सांभाळायचा प्रयत्न करत आहेत. दोघेही सावधपणे फलंदाजी करत आहेत.

मुंबई इंडियन्सची प्लेईंग ११ -

रोहित शर्मा, रियान रिकल्टन (विकेटकीपर), विल जॅक्स, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, नमन धीर, रॉबिन मिन्झ, मिचेल सॅंटनर, दिपक चहर, ट्रेंट बोल्ट, सत्यनारायण राजू

चेन्नई सुपर किंग्सची प्लेईंग ११ -

रचिन रविंद्र, ऋतुराज गायकवाड (कर्णधार), दिपक हुडा, शिवम दुबे, रविंद्र जडेजा, सॅम करन, एमएस धोनी (विकेटकीपर), आर अश्विन, नूर अहमद, नॅथन एलिस ,खलील अहमद

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akkalkot : दिवाळीच्या सुट्ट्यांदरम्यान अक्क्लकोटचं श्री स्वामी मंदिर 20 तास खुलं राहणार | VIDEO

Education Justice : पुण्यात नामांकित कॉलेजने कागद पडताळणीसाठी केला उशीर, तरुणाची ब्रिटनमधली नोकरी गेली, नेमकं काय आहे प्रकरण?

Maharashtra Live News Update : धनंजय मुंडे यांच्या भाषणानंतर करुणा मुंडे यांची प्रतिक्रिया

Bhaubeej Gift: अजून ठरलं नाही बहिणीसाठी गिफ्ट? पाहा भाऊबीजासाठी खास आणि ट्रेंडी गिफ्ट Ideas

Gold Rate: धनत्रयोदशीला सुवर्णनगरीत सोनं स्वस्त; ३००० रुपयांची घसरण, ग्राहकांची गर्दीच गर्दी

SCROLL FOR NEXT