ipl auction twitter
Sports

IPL 2025 Auction: IPL चा लिलाव किती वाजता सुरु होईल? समोर आली मोठी अपडेट

IPL 2025 Mega Auction Date Time And Location: आयपीएल २०२५ स्पर्धेचा लिलाव किती वाजता सुरु होईल? याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

Ankush Dhavre

आयपीएल २०२५ स्पर्धेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. हे ऑक्शन येत्या २४-२५ नोव्हेंबरला होणार आहे. आयपीएल गव्हर्निंग कमिटीने दिलेल्या माहितीनूसार, हे ऑक्शन सौदी अरेबियातील जेद्दामध्ये होणार आहे.

या ऑक्शनसाठी एकूण १५७४ खेळाडूंनी आपलं नाव नोंदवलं आहे. तारीख आणि ठिकाण ठरल्यानंतर आता हे ऑक्शन किती वाजता सुरु होणार याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

खेळाडूंवर पडणार पैशांचा पाऊस

या मेगा ऑक्शनमध्ये १० संघ एकूण २०४ खेळाडूंवर बोली लावणार आहेत. त्यासाठी सर्व संघांकडे ६४१.५ कोटी रुपये रक्कम शिल्लक आहे. काही दिवसांपूर्वी सर्व संघांनी आपल्या रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. त्यानुसार, एकूण ४६ खेळाडूंना रिटेन करण्यात आलं आहे. पंजाबने केवळ २ खेळाडूंना रिटेन करण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाबकडे अजूनही ११० कोटी रुपये शिल्लक आहेत.

कोणत्या संघाकडे किती रक्कम शिल्लक

पंजाब किंग्ज- ११०.५ कोटी

राजस्थान रॉयल्स- ४१ कोटी

कोलकाता नाईट रायडर्स -५१ कोटी

मुंबई इंडियन्स-४५ कोटी

चेन्नई सुपर किंग्ज -५५ कोटी

दिल्ली कॅपिटल्स -७३ कोटी

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु- ८३ कोटी

लखनऊ सुपर जायंट्स -६९ कोटी

सनरायझर्स हैदराबाद -४५ कोटी

गुजरात टायटन्स -६९ कोटी

केव्हा होणार आयपीएल २०२५ स्पर्धेसाठीचं ऑक्शन

हे ऑक्शन २४ आणि २५ नोव्हेंबरला पार पडणार आहे.

कुठे होणार आयपीएल ऑक्शन?

आयपीएल २०२५ स्पर्धेचं ऑक्शन जेद्दामध्ये होणार आहे.

कुठे पाहता येणार लाईव्ह?

आयपीएल ऑक्शन स्टार स्पोर्ट्सवर लाईव्ह पाहता येणार आहे.

किती वाजता सुरु होणार आयपीएल लिलाव?

हे ऑक्शन किती वाजता सुरु होणार याबाबत अधिकृतरित्या कुठलीही माहीती समोर आलेली नाही. मात्र माध्यमातील वृत्तानुसार हे ऑक्शन भारतीय वेळेनुसार सकाळी ११ वाजता सुरु होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : नागपुरातील दक्षिणामूर्ती गणेश मंडळाचा गणपती बडकस चौकात पोहचणार

Sahara India Scam : सहारा इंडियाच्या विरोधात ईडीची मोठी कारवाई; सुब्रतो रॉय यांच्या पत्नी, मुलांच्या अडचणीत वाढ

Zakir Khan: 'प्रकरण हाताबाहेर जाण्यापूर्वी...' झाकीर खानने केली मोठी घोषणा, स्टेज शोमधून घेणार ब्रेक

नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत शिवतांडव नृत्य ठरले विशेष आकर्षण|VIDEO

IPS अंजना कृष्णा प्रकरणात मिटकरींचा यू-टर्न; आधी चौकशीची मागणी,आता दिलगिरी

SCROLL FOR NEXT