lucknow super giants x
Sports

156.7 kmph वेगाने गोलंदाजी करणारा परतला, IPL 2025 मध्ये लखनऊ सुपर जायंट्सचीही 'ताकद' वाढणार

IPL 2025 : लखनऊ सुपर जायंट्सच्या ताफ्यात वेगवान गोलंदाजाची एन्ट्री झाली आहे. या गोलंदाजाने मागच्या सीझनमध्ये नाव कमावले होते. त्याच्या आगमनामुळे लखनऊचा संघ आणखी बळकट होणार असल्याचे म्हटले जात आहे.

Yash Shirke

IPL 2025 च्या पॉईंट्स टेबलमध्ये लखनऊ सुपर जायंट्स सध्या पाचव्या क्रमावर आहे. लखनऊच्या संघाने ७ पैकी ४ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर ३ सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामोरे जावे लागले आहे. दरम्यान वेगवान गोलंदाज मयंक यादव खेळण्यासाठी फिट झाल्याने लखनऊच्या संघाला मोठा दिलासा मिळाला आहे.

लखनऊ सुपर जायंट्सच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला. या व्हिडीओच्या माध्यमातून मयंक यादव आयपीएलमध्ये खेळण्यासाठी परतला असल्याची घोषणा करण्यात आली आहे. मयंक यादव पाठीच्या दुखण्यामुळे आयपीएलमधून बाहेर पडला होता. सीझनच्या सुरुवातीला तो परतण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. पण पायाच्या बोटाला दुखापत झाल्याने मयंक यादवचा कमबॅक लांबणीवर पडला. पण आता पूर्णपणे फीट झाल्यानंतर मयंक यादव मैदानावर कमबॅक करण्यास तयार आहे.

मयंक यादवने आक्रमक गोलंदाजी करत आयपीएल २०२४ मध्ये धुमाकूळ घातला होता. त्याने सातत्याने १५० किमी/ताशी पेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी केली होती. मागच्या सीझनमध्ये तो लखनऊसाठी फक्त ४ सामने खेळला होता. मेगा लिलावापूर्वी लखनऊ सुपर जायंट्सच्या ५ राखीव खेळाडूंमध्ये त्याचा समावेश होता.

लखनऊ सुपर जायंट्सचे मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी मयंक यादवच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचे म्हटले होते. मयंक सध्या फिट आहे. तो मैदानात खेळण्याच्या तयारीत आहे. काल मी एनसीएमध्ये गोलंदाजी करतानाचा त्याचा व्हिडीओ पाहिला होता. मयंक यादव ९० ते ९५ टक्के वेगाने गोलंदाजी करत आहे. दरम्यान लखनऊचा संघ पुढील सामना १९ एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळणार आहे. या सामन्यात मयंकचा समावेश केला जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT