IPL 2025 KKR PBKS 
Sports

IPL 2025 KKR PBKS: पंजाबसमोर KKRने गुडघे टेकले; जाणून घ्या कोलकाता संघाच्या पराभवाची ३ मोठी कारणे

IPL 2025 KKR PBKS: आयपीएल २०२५ चा ३१ वा सामना आज मुल्लानपूर क्रिकेट स्टेडियमवर झाला. हा सामना श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्जने जिंकला.

Bharat Jadhav

आयपीएल २०२५ चा ३१ वा सामना आतापर्यंत झालेल्या सामन्यामध्ये रोमांचकारी ठरला. मुल्लानपूर क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या सामन्यात अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्सचा संघ अवघ्या ९६ धावांवर गारद झाला. कर्णधारपदाची जबाबदारी उत्तमपणे संभाळत श्रेयस अय्यरने हा सामना जिंकला.

पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण कोलकाताच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी करत संपूर्ण पंजाब संघाला फक्त १११ धावांवर रोखलं. इतकं कमी धावांवरही पंजाबने हा सामना जिंकला. पंजाबच्या गोलंदाजांनीही शानदार गोलंदाजी करत कोलकाताला फक्त ९६ धावांत गुंडाळले. केकेआर संघाचा पराभव कसा झाला काय आहेत कारणं हे जाणून घेऊ.

क्विंटन डी कॉकचा खराब फॉर्म

क्विंटन डी कॉकचा फॉर्म केकेआरसाठी डोकेदुखी बनला आहे. तो अद्याप संघाला चांगली सुरुवात देऊ शकलेला नाहीये. या हंगामात त्याने ७ सामन्यांमध्ये फक्त १४३ धावा केल्या. पंजाब विरुद्धच्या सामन्यातही तो ४ चेंडूत फक्त २ धावा करू शकला. त्याचा असा फॉर्म केकेआरच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण होते.

रहाणेचं डीआरएस न घेणं

पंजाबविरुद्धच्या सामन्यात रहाणेने १७ चेंडूत १७ धावा केल्या. या डावात तो चांगल्या लयीत दिसत होता. पण फलंदाजी करताना तो चहलच्या चेंडूवर एलबीडब्ल्यू झाला म्हणजेच पायचीत झाला. यावेळी त्याला डीआरएस घेण्याची संधी होती, पण त्याने डीआरएस घेतला नाही. त्याचा फटका संघाला बसला कारण रिप्लेमध्ये रहाणे बाद नसल्याचे दाखवले गेले होते. अंगकृष्ण रघुवंशी यांनीही त्यांना डीआरएस घेण्यास सांगितले होते, पण त्यांनी त्याचे ऐकले नाही. शेवटी केकेआरला पराभव सहन करावा लागला.

खालच्या आणि मधल्या फळीचे अपयश

केकेआरची खालची आणि मधली फळी डाव सावरण्यात अपयशी ठरत आहे. बऱ्याच काळापासून ही फळी संघर्ष करत आहे. या सामन्यातही केकेआरचा खालचा आणि मधला क्रम पूर्णपणे अपयशी ठरला. रिंकू सिंग (२), वेंकटेश अय्यर (७) आणि रमणदीप सिंग (०) हे खेळाडू अपयशी ठरले. यामुळेही केकेआरला या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT